सजग नागरिक टाइम्स :ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य(वय 89) यांचे आज सायंकाळी साडेसातच्या दरम्यान निधन झाले. काही दिवसापूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. या ठिकाणीच उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
पुना हॉस्पिटलमधील उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नव्हते. परिणामी त्यांची प्रकृती आणखी खालावली होतीे. भाई वैद्य यांची आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तीन आठवडय़ांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विकारामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता. त्यांच्यावर कार्डिऑक अतिदक्षता विभागात (सीसीयू) उपचार सुरू होते. त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते.
पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक मांडणे आणि सेवानिवृत्तांच्या निवृत्तिवेतनाची महागाईशी जोडणी करण्याचे अनेक निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले होते .
भाई वैद्ययांचे पार्थिव ३.४.२०१८ रोजी राष्ट्रसेवादलात अभिवाद्नार्थ ठेवण्यात येईल व सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येईल .