क्या लाया था,क्या ले जायेगा?

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Juma Tul wida: पवित्र रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवाराला जुमअतुल विदाअ म्हणून संबोधले जाते

juma-tul-wida-28-ramzan-ul-mubarak

Juma Tul wida : सजग नागरिक टाइम्स :  आजचा शुक्रवार यावर्षीच्या पवित्र रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार आहे. जुमअतुल विदाअ म्हणून त्याला संबोधले जाते.

आठवड्यांच्या दिवसांमध्ये शुक्रवार महत्त्वपूर्ण आहे. आणि रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार असल्याने आजच्या प्रार्थनेचे मूल्य असाधारण आहे.

ज्याप्रमाणे श्रावणामध्ये तिसरा सोमवार महत्त्वपूर्ण गणला जातो. त्या प्रमाणेच रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारला महत्व दिले जाते.

अर्थात याला कोणताही धार्मिक आधार नाही .रमजान महिना आता आपल्या पूर्णत्वाकडे पूर्णपणे झुकला आहे.

Advertisement

इन्सानियत अर्थात मानवता

दोन दिवस शिल्लक आहेत. ज्यावेळी रमजान सुरू झाला, त्यावेळी महिना कसा जाणार हा प्रश्न विचारला जात होता.

आज महिना कसा गेला असा प्रश्न विचारला जातोय.दिवसांची बरकत निघून गेलेली आहे.

हे कयामतचे एक लक्षण आहे.कोरोना मुळे जगभर लॉकडाऊन झाले.

ज्या ज्या गोष्टींना महत्त्व दिले जात होते त्या सर्व हीन ठरल्या . कुणामुळेच कुणाचे काम थांबत नाही.

Advertisement

हा एक महत्वाचा संदेश सर्वत्र पाहायला मिळाला. जीवंतपणी एकमेकाला मानसन्मान देणारे मृत्युमुखी पडल्यानंतर याची लवकर विल्हेवाट लावा असा आग्रह धरतात.

हा निसर्गाचा नियम आहे. जो जगात आला, त्याला परत जायचे आहे. इस्लामी मान्यतेनुसार हे जग म्हणजे एक मुसाफिरखाना आहे.

अल्लाहच्या मर्जीसाठी दान

आपण सर्व येथे प्रवासी आहोत. दुनियेत आलो, काही काळ थांबलो, पुन्हा परत जायचं आहे.

Advertisement

येताना काहीही घेऊन आलेलो नाही. जाताना काहीही घेऊन जाता येत नाही.

किती कमावलं, कसं कमावलं, काय कमावलं ? हे सर्व काही इथेच सोडून जायचे आहे.जेवढं खाल्लं, जेवढं परिधान केलं, तेवढं फक्त आपलं होतं.

Advertisement

बाकी सगळं आता इतरांचं आहे. हा विचार आपण रुजवला पाहिजे माणूस आपल्या कर्माने आठवणीत राहतो. जास्त पैसे कमावणारे स्वतः कधी चांगले राहत नाही.

पैसे कमावण्याच्या धुंदीत अहोरात्र कष्ट करतात. स्वतःचे भान राहात नाही. परंतु सर्व कमावलेला पैसा इथेच राहणार आहे.

Advertisement

म्हणून जे काही कमावलं त्यातून शाश्‍वत पुण्य प्राप्त होणारी साधने आपण निर्माण केली पाहिजे.

महत्त्वपूर्ण शब ए कद्र 

मशिदी बांधणे, पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदणे,सावलीसाठी झाडे लावणे, शाळा,

मदरसे सुरू करणे या गोष्टींवर जो काही खर्च होईल त्यापासून मिळणारे पुण्य शेवटपर्यंत चालू राहणार आहे.

तेव्हा अशी सत्कार्य आपण केली पाहिजे. वाचनालय सुरु केली पाहिजे. कारण ज्ञान दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.ईश्वराला धर्म,जात,पंथ भेद मान्य नाही.

Advertisement

आपण ही तो करू नये.माणसं कोणत्याही रंगाची असली तरी सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे. यातून काय तो बोध घ्यावा.

सत्ता, संपत्ती, प्रसिद्धीच्या नादात आपण जीवनाचा मूळ हेतू विसरून गेलो आहोत. एकमेकांच्या सेवेसाठी अल्लाहने आपल्याला इथे पाठवले आहे.

आपल्यामुळे लोकांना त्रास होणार नाही. कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे .

शेवटचा अशरा मुक्तीचा

Advertisement

हजरत पैगंबरांनी दिलेली शिकवण आचरणात आणली पाहिजे .

चार पुस्तके शिकल्याने किंवा धार्मिक शिक्षणाचा कोर्स पूर्ण केल्याने आपण ज्ञानी होत नाही

तर आपल्या वर्तनाने (आमाल) आपण स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविले पाहिजे.खोटे नाटे उद्योग करून मिळवलेले यश हे कधीच टिकत नसते .

एवढे जरी आपण लक्षात ठेवले तरीसुद्धा आपल्याला जीवन कसे जगले पाहिजे याचा मार्ग सापडेल.(क्रमशः)

Advertisement

सलीमखान पठाण
9226408082

One thought on “क्या लाया था,क्या ले जायेगा?

Comments are closed.