ब्रेकिंग न्यूज

कोढव्यातील नगरसेवक गफूर पठाणयांना चौघांनी केली मारहाण

Advertisement

Corporator Gafur Pathan News: कोढव्यातील नगरसेवक गफूर पठाणयांना चौघांनी केली मारहाण

टर्फ क्लब येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक
(Corporator) Gafur Pathan यांना बाहेर बोलावून चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना आता थेट नगरसेवकावरच हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत नगरसेवक Gafur Pathan यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार  लियाकत खान,सलाऊद्दीन कुरेशी, मोइद्दीन सैय्यद आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदी न्युज पड़ने के लिए यहाँ पर क्लिक करे 

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पठाण यांच्या भावाचे काही जणांसोबत आर्थिक व्यवहार होते. टर्फ क्लब येथे Gafur Pathan आणि त्यांचे कुटुंबीय साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते.  पावणेबाराच्या सुमारास चौघे जण तेथे आले.

इसे क्लिक करे और Valentine Day की शुभकामनाएं दे

त्यांनी कमरेला हत्यार लावून धमकी दिली. त्यानंतर चौघांनी पठाण यांना मारहाण केली. यातील तिघांची नावे पठाण यांनी दिली असून, एकाचे नाव त्यांना माहिती नाही. या प्रकरणी वानवडी पोलिस तपास करत आहेत

Share Now

One thought on “कोढव्यातील नगरसेवक गफूर पठाणयांना चौघांनी केली मारहाण

Leave a Reply