मित्राला भेटायला आला अन Lift मध्ये अडकला(kondhwa yewalewadi)

(kondhwa yewalewadi news) मित्राला भेटायला आला अन Lift मध्ये अडकला; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर सुटका

kondhwa yewalewadi hi came to meet a friend and got stuck in a lift

Kondhwa yewalewadi news :पुणे – आज(मंगळवार) सायंकाळी पाच वाजता एक अकरा वर्षांचा मुलगा साहिल पोटफोडे

आपल्या मित्राला भेटण्यासाठी कोंढव्यातील येवलेवाडीच्या श्री सृष्टी सोसायटी या अकरा मजली इमारतीत आला,व लिफ्टची गियर वायर अचानक तुटल्याने चौथ्या मजल्यावर अडकला होता.

रहिवाशांनी याची खबर अग्निशमन दलाला देताच कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने वर्दिच्या ठिकाणी पोहोचले.

Advertisement
video पहाण्यासाठी वर क्लिक करा

श्री सृष्टी सोसायटी येथे पोहचल्यावर जवानांनी साहिलला आवाज देऊन तो व्यवस्थित असल्याची खात्री केली.

लगेच पाचव्या मजल्यावर जवानांनी धाव घेऊन मोठ्या रशीच्या साह्याने लिफ्टला बांधून स्थिर करत जास्त धोका होणार नाही याची खात्री केली.

नंतर दलाकडिल हायड्रोलिक बोल्ड कटर, सर्क्युलर सॉ व टुल किट वापरुन लिफ्टची जाळी व पत्रा कापून साहिलची सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका केली.

Advertisement

सदर कामगिरीमधे कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे वाहन चालक शरद गोडसे तसेच जवान अजित बेलोसे, निलेश लोणकर, मंगेश टकले, रवि बारटक्के यांनी सहभाग घेतला.

हेपण वाचा :रविवार पेठेत जुना वाडा कोसळला 

कोंढव्यातील बोगस गुंठेवारी बांधकामांची चौकशी करा :अॅड.समीर शेख 

Advertisement
telegram

3 thoughts on “मित्राला भेटायला आला अन Lift मध्ये अडकला(kondhwa yewalewadi)

Leave a Reply