Homeताज्या घडामोडीकेपीआयटी 'आणि 'ज्ञान प्रबोधिनी'आयोजित 'छोटे सायंटिस्टस्' स्पर्धेचा समारोप -

केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप –

————–
Sajag Nagrikk Times:पुणे :केपीआयटी ‘ टेक्नॉलॉजीस लिमिटेड आणि (Dnyan Prabodhini) ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप   ‘केपीआयटी ‘कॅम्पस   , हिंजवडी -फेज -३ येथे झाला . विजेत्या शाळांना पारितोषिके देण्यात आली .

स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते .  या उपक्रमात  ‘वी -सॉल्व्ह ‘ ही समस्या परिहार स्पर्धा होती , त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील समस्या देऊन त्यावर वैज्ञानिक उत्तर शोधण्यास,प्रकल्प करण्यास सांगण्यात आले  होते  . विजेत्यांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,स्कुलबॅग ,व   विजयी शाळांना ट्राफी देण्यात आली  . 

पुणे मनपा क्षेत्रातील  इयत्ता 8 वी गटात  प्रथम क्रमांक संत नामदेव माध्यमिक विद्यालय( महर्षी नगर पुणे ),  दुसरा क्रमांक राजीव गांधी ई लर्निग  स्कुल   (सहकार नगर), तृतीय क्रमांक  यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय( बिबवेवाडी) यांना मिळाला . पिंपरी -चिंचवड मनपा गटात  प्रथम क्रमांक  पिंपरी  –  चिंचवड  मनपाचे थेरगाव  स्कुल  , द्वितीय क्रमांक  पिंपरी -चिंचवड    मनपाचे पिपळे गुरव स्कुल यांना मिळाला . 

 इयत्ता 8 वी गटात मावळ व मुळशी विभागातून   प्रथम क्रमांक संत तुकाराम विद्यालय( शिवणे)  दुसरा क्रमांक  श्रीराम विद्यालय (नवलाख उंबरे),तिसरा क्रमांक स्व बाबूराव रायरीकर माध्यमिक विद्यालय(उरवङे) यांना मिळाला .

आमच्या विडिओ बातम्या पहाण्यासाठी क्लिक करा


इयत्ता 9 वी गटात प्रथम क्रमांक ग्राम प्रबोधिनी विद्यालय( साळुम्बरे ).दुसरा क्रमांक पंचक्रोशी विद्यालय (दारूब्रे)  तृतीय क्रमांक व्हिजन इंग्लिश  स्कुल   (न-हे आंबेगाव ) यांना मिळाला .
अटल टिंकरिंग लॅब ‘ असलेल्या शाळांच्या  ‘छोटे सायंटिस्टस्  ‘ स्पर्धेत एसपीएम स्कुलचा प्रथम क्रमांक आला .द्वितीय क्रमांक  मिलेनियम नेशनल  स्कूल (पुणे )  तर तृतीय क्रमांक सुंदराबाई राठी स्कुल   (पुणे) यांनी पटकावला .  

तुमच्या प्रिय मित्रांना सुंदर  शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा


  किशोर पाटील (व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ,केपीआयटी  उद्योग  समूह ),  पिंपरी -चिंचवड  मनपा माध्यमिक शिक्षण अधिकारी पराग मुडे ,डॉ. सारिका केळकर ,राहूल उपलप  , संत रंजन ( टीम लिङर ,केपीआयटी) प्रकाश रणनवरे(स्पर्धा समन्वयक ) यांच्या च्या हस्ते बक्षिसे  देण्यात आली . 


१३ फेब्रुवारी रोजी  पुण्यात झालेल्या या स्पर्धेत  मावळ -मुळशी तालुक्यातील २०  शाळा ,पुणे महानगर  क्षेत्रातील 10 शाळा ,पिंपरी -चिंचवड क्षेत्रातील ८ शाळा अशा 38 शाळा आणि २०० विद्यार्थी सहभागी झाले.  १४ फेब्रुवारी रोजी ‘अटल टिंकरिंग लॅब’ च्या १६ शाळा आणि १०० विद्यार्थी सहभागी झाले .

सनाटा के हिंदी समाचार पढने के लिए  क्लिक करे।


 किशोर फडतरे , तुषार जुवेकर (केपीआयटी ) यांनी स्पर्धा संयोजन केले .प्रणव पुजारी यांनी सूत्रसंचालन केले . केपीआयटीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख राजेश सिंग ,  परेश शिंदे ,गणेश भताणे ,विशाल गायकवाङ, अक्षय कुलथे , प्रशांत दिवेकर उपस्थित होते .  २०१२ मध्ये २० शाळांमध्ये ८०० विद्यार्थ्यांमध्ये सुरु झालेला हा उपक्रम १७७ शाळा आणि १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे . भारतातील २० शहरांमध्ये हा उपक्रम पोहोचला असल्याची माहिती आयोजकांनी दिली

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular