ईद स्पेशलताज्या घडामोडीपुणे

पुण्यात बकरी ईद च्या ‘फेसबुक लाईव्ह’ ‘ नमाज’ ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

Advertisement

(Facebook Live) सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले होते

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांचा घरातून नमाज’ मध्ये सहभाग

large-response-to-bakra-eids-facebook-live-namaz-in-pune

Facebook Live : सजग नागरिक टाइम्स : पुणे: कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये,

या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मस्जिद मध्ये बकरी ईद नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात  आले .

१ ऑगस्ट रोजी  बकरी ईद च्या दिवशी सकाळी ८ वाजता ‘फेसबुक लाईव्ह’ पठण  करण्यात आले .

 मुस्लीम बांधवांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत घरातून सहभाग घेतला.

आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली.

  येथे दर आठवड्यात   शुक्रवारी दुपारी दीड वाजता जुम्मा नमाजचे फेसबुक लाईव्ह द्वारे पठण करण्यात येते.

मस्जिदचा चंदा गोरगरिबांना : उमर मस्जिद

आझम कॅम्पस मस्जिदमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद, शराफत अली यांनी या उपक्रमादरम्यान  नमाज पठण केले.

तरआझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी  नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे पासून हा उपक्रम दर शुक्रवारी  सुरु आहे.

अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मस्जिद मध्ये गर्दी होत नाही,

Advertisement

फक्त पेश इमाम मस्जिदमध्ये नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.

एरवी शहराच्या विविध भागात मस्जिदमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा  धोका लक्षात घेऊन  शुक्रवारी मस्जिद मध्ये जाता येत  नाही.

त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.

प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंक द्वारे या नमाज पठणात सहभागी होता येते.  https://www.facebook.com/azamcampus1922

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद च्या दिवशी देखील सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मस्जिद मध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले होते.

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.मग ईद -उल -अजहा ची नमाज अदा करण्यात आली.

त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ करण्यात आली.पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी नमाज अदा केली.

सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले होते.

Kamla Nehru Hospital मधील गेली ८ वर्षे बंद आयसीयु तातडीने सुरु करावे

Share Now