ताज्या घडामोडीपुणे

शफि इनामदाराच्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पुणे मनपाचे पत्र

Advertisement

(Structural audit) शालेय विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शफि इनामदाराच्या शाळांच्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करून अहवाल पुणे मनपाला सादर करण्याचे पत्र

सजग नागरिक टाईम्स 🙁Building Structural audit,ऑडिट) पुणे हडपसर सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टचा संचालक/अध्यक्ष शफि इनामदाराच्या

शाळांच्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याचे पत्र पुणे महानगरपालिकाने आयडियल एज्युकेशन ट्रस्टला दिलेे आहे,

शफि इनामदाराचे आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित अलजदीद उर्दू प्रायमरी स्कूल, अलजदीद उर्दू हायस्कूल, यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय, समता प्राथमिक विद्या मंदिर,

आयडियल इग्लिश प्रायमरी स्कूल, आयडियल इग्लिश ज्युनियर काॅलेज असे एकुण सात शाळा आहेत ,

notice-of-pune-municipal-corporation-to-conduct-a-structural-audit-of-shafi-inamdar-schools

त्या शाळांना पुणे महानगरपालिकेची कोणत्या हि प्रकारची बांधकाम परवानगी नसल्याने. गेल्या काही महिन्यापुर्वीच पालिकेने नोटिसा हि बजावल्या होत्या

तसेच 3 जून 2019 रोजी शफि यासीन इनामदार विरोधात अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (MRTP ACT) एमआरटीपी अॅकट नुसार गुन्हा हि दाखल झाला आहे ,

गेल्या दोन महिन्यापुर्वी कोंढवा येथील भिंत कोसळून नागरिकांचा मृत्यू झाल्याने अनधिकृत बांधकामांचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहे.

त्याचा विचार करून पुणे महानगरपालिका सतर्क झालेली आहे, त्यामुळे आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित शाळांच्या इमारतीमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालून

शिक्षण दिले जात असल्याचे सजगच्या प्रतिनिधीने पालिकेच्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले होते ,

Advertisement

त्याची दखल घेत पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विकास विभागाने पुणे झोन क्रं 1 ने आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित शाळांच्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे पत्र पाठविली आहे,

हेपण वाचा :शफि इनामदाराचा जामीनदार संशयाच्या भोवऱ्यात

इनामदार ने केलेल्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगरपालिकाने कोणत्याहि प्रकारची कारवाई करू नये

यासाठी एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाने मनपा अधिका-यांवर दबाव आणला असल्याचेहि नाव न सांगण्याचा अटिवर एका कर्मचारिने सांगितले,

जर नगरसेवकच अश्या अनधिकृत बांधकाम करणा-यांना, विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणाऱ्याना पाठिशी घालून साथ देत असतील तर

सदरील ठिकाणी दुर्घटना झाल्यास सदरील नगरसेवकालाही जबाबदार धरावे लागेल?

बांधकाम विकास विभागाने बजावलेल्या पत्रात असे हि नमूद केले आहे कि सदरील तक्रार गंभीर स्वरूपाची आली आहे

ते लक्षात घेता आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या शाळांच्या (Building) इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करून अहवाल सादर करावे

अन्यथा काहि दुर्घटना व हाणी झाल्यास याला सदरील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट जबाबदार राहिल असे पत्रात म्हंटले आहे .

आता या पुणे महानगरपालिकेच्या पत्राची दखल सदरील संस्था व त्याचे सभासद किती तत्परतेने घेतील

आणि हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी काय पाऊल उचललेले जाणार या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष टिकून राहणार आहे.

हेपण वाचा :हडपसर येथील शफि इनामदाराच्या सर्व शाळांचे अहवाल सादर करण्याचे पुणे जिल्हाधिकारीचे आदेश,
Share Now