Homeताज्या घडामोडीकुंभाराच्या मालाला भाव नसल्यामुळे कुंभाराची दिवाळी संकटामध्ये

कुंभाराच्या मालाला भाव नसल्यामुळे कुंभाराची दिवाळी संकटामध्ये

मालेगाव – कुंभाराच्या मालाला भाव द्यावे ही मागणी कुंभार समाजाने जनतेला केली आहे दिवाळी हा सण सनातन धर्मातला एकमेव उत्सवाचा सण आहे या सणांमध्ये आपण सगळेजण सजावटीच्या मागे लागतो व नवीन ड्रेस कपडे वगैरे सर्व काही मार्केट मधून घेतो पण काही कंपनीच्या प्रोडक्टमुळे कुंभार समाज हा मागे आला आहे जसे की आपण लाइटिंग लाइटचा प्रमाण जास्त वाढलेले आहेत आपल्या घराला लावलेल्या लायटिंग मुळे घरातले दिवे कमी झालेले आहेत त्या मातीच्या दिव्यामध्ये आपले सत्य सामावलेले आहेत व सर्वांनीही मातीचेच दिवे लावून मातीचा अस्तित्व समजून घ्यायला हवं कारण आपण याच मातीमध्ये जन्मलेले आहे

आणि याच मातीच्या दिव्याचा सण उत्सव आपल्याला करायचा आहे जर आपण कुंभार समाजाकडून दिवे घेण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त दिवे घेऊन जर आपण आपल्या घरीदारी सर्व ठिकाणी दिवे लावून सजावट केली तर दिवाळीची आपली सुद्धा सजावट पूर्ण होईल कुंभार समाजाची सुद्धा दिवाळी साजरी होईल व तसेच त्यांच्या छोट्याशा मुलाची बाळाचे शिक्षण सुद्धा व्यवस्थित होईल आज त्या मुलाची अवस्था काय असेल ज्यांचे शिक्षणाची सोय लागत नाही आणि दिवाळीनिमित्त कपडे सुद्धा मिळत नाहीत त्यांची फार दुर्लभ व्यथा आहे आपल्या छोट्याशा सजावटीमुळे त्या गरीब कुंभार समाजाकडे सुद्धा आपल्या लक्षात राहील सजावटीसाठी कोणत्याही बाहेर देशातल्या कंपनीची लाइटिंग वापरू नये सर्वांनी आपल्या महाराष्ट्रातल्या मातीचे आणि कुंभाराच्या माती पासून तयार झालेले दिवे लावावे ही मागणी कुमार समाजाने जनतेला केलेली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular