Latest kondhwa news : कोंढव्यात अतिक्रमण विभागाची जोरदार कारवाई …
Latest kondhwa news : सजग नागरिक टाइम्स : पुणे :- कोंढवा येथे बुधवारी दुपारी महापालिका आणि वाहतूक शाखेने कारवाई करून अतिक्रमणे हटवली.
त्यामध्ये इमारतीलगतच्या फूटपाथवर व रस्त्यावर असलेल्या हातगाड्याही काढण्यात आली.सुमारे दोन तासांहून अधिक वेळ पोलिस चौकात थांबून होते.
बुधवारी वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बुधवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
काही नागरिकांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून अभिनंदन केले.यावेळी येथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
ग्राहक रस्त्यावरच वाहने थांबवत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होत होता.
या कारवाई मध्ये अतिक्रमण विभागाचे निरीक्षक श्याम तारू व वाहुतक पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्या देखरेखीखाली
पोलीस अधिकाऱ्यांनी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनि ही कारवाई केली असल्याची माहिती प्रतिनिधी मुज्जम्मील शेख यांनी दिली.