Chetan tupe कोंढव्याच्या विकासासाठी कटिबद्ध
कोंढवा हा मुस्लिम बहुबल परिसर म्हणून ओळखला जातो. मुस्लिम समाजाकडून अनेक खासदार, आमदार, नगरसेवक निवडून देण्यात आले आहे. कोंढवा मधील विकासासाठी चेतन तुपे यांना निवडून आणण्यासाठी हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, गफूर पठाण हे मैदानात उतरले आहेत.
या तीनही माजी नगरसेवकांची कोंढवा मध्ये चांगली पकड आहे. तर राजकारणात त्यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. चेतन तुपे हडपसर विधानसभेतून निवडणूक लढवत आहे. हाजी फिरोज शेख म्हणाले की, चेतन तुपे हे संसदपटू आहेत. तर ते एक चांगले अभ्यासू आमदार आहेत.
त्यांनी जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कधीच केले नाही. ते अजितदादा पवार गटात असल्याने काही विरोधक त्यांची छबी खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आजपर्यंत त्यांनी जे चांगले काम केले त्याबद्दल विरोधक कधी काहीच बोलणार नाही. अजितदादा पवारांनी मुस्लिम समाजासाठी बऱ्याच वेळा आवाज उचलला आहे. ते उपकार विसरून चालणार नाही. मी आणि माझे सहकारी मित्र रईस सुंडके ,गफूर पठाण हे चेतन तुपेंना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. विरोधकांनी कितीही दिशाभूल केली तरी गुलाल आम्हीच उडवणार्, यात शंकाच नाही.