kothari wheels चा परवाना 30दिवसासाठी निलंबित
टिळक रोड येथील kothari wheels ने विना पासिंग ची वाहने ग्राहकांना दिल्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळाने (RTO)ने परवाना 30 दिवसासाठी निलंबित केला आहे.
याबद्दल नरेश ठक्कर ने सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांच्या द्वारे 25 जानेवारी रोजी तक्रार केली होती,
त्या अनुषंगाने Rto ने kothari wheels ला नोटीस बजावून खुलासा मागितला होता.कोठारी व्हील्स ने खुलासा न दिल्याने,
सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी कोठारी व्हील्सचा परवाना 1 मार्च पासून 30 दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहे .
पुणे शहर वाहतुक पोलीसांकडून कलम 207 चा चुकिचा बडगा?
यापूर्वी ही kothari wheelsचा परवाना 7 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला होता.एखाद्या ग्राहकाने शोरूम मधून नवीन गाडी विकत घेतली असता
त्या वाहनांची जोपर्यंत rto मध्ये नोंदणी होऊन गाडी नंबर येत नाही तो पर्यंत वाहन गाडी मालकाला देेेता येत नाही,
विना पासिंग गाडी चालवल्यास काही अपघात झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळत नाही,
व गाडी पोलिसांनी धरल्यास त्याचा भुर्दंड देखील वाहन चालकाला भोगावा लागतो,
व गाडी पासिंग होण्यापूर्वीच गाडीचे हप्ते चालू होतात.या सर्वांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने
अँटी करप्शन स्कोडचे संस्थापक वाजिद खान यांनी rto ला तक्रार करून पाठपुरावा केल्याने कोठारी व्हील्सला हा दणका बसला आहे.
हेपण वाचा : पुणे वाहतुक पोलिसां कडून रिक्षा चालकांची पिळवणूक
(RTO) आरटीओ म्हणते रिक्षा शिपने देता येते
सनाटा प्रतिनिधी: May 8, 2019: Traffice police News:अजहर खान :पुणे शहराची मेट्रोचे शहर म्हणून नव्याने ओळख निर्माण होत आहे,
त्यामुळे काहि गावातील बेरोजगार नागरिकांचा कल रोजंदारीसाठी पुण्याकडे वाढत आहे,
त्यात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) बेरोजगारांना स्वताचा रोजगार करता यावा ,
यासाठी रिक्षा परमीट परवाना मोठ्या प्रमाणावर सोडले आहे त्याचा फायदा अनेक गरजूंना देखील झाला आहे.
परंतु वाहतुक पोलिसांच्या मनमानी कारभार,आर्थिक लूट प्रकरणी रिक्षाचालकअक्षरशः वैतागले आहेत.
पुणे शहर वाहतुक पोलीसांकडून सध्या कारवाई सुरू आहेत लायसेन्स, पीयूसी, कागदपत्रे, नंबर प्लेट,
लाईट नसल्याचे सांगून अश्या अनेक विषय काढून रिक्षा चालकांची पिळवणूक करून एका प्रकारे बलीचा बकराच बनविला जात आहे.
Sixsense film production च्या वितरकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
परंतु तर आता नविन जावई शोध लावून पुणे शहर वाहतुक पोलीसांनी अकलेचे तारेच तोडले आहेत,
रिक्षा शीपने देता येत नाही व ज्याच्या नावाने आरटीओ ने परमीट दिले आहे त्या व्यकतीनेच सदरील रिक्षा चालवावी असे म्हणत शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केल्या आहेत,
त्यातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून तेरी भी चुप मेरी भी चूप असे प्रकार घडत आहे.