(Loot)पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चालू आहे लुट..
पुणे प्रतिनिधी ” बाहेर गावी जाण्यासाठी किंवा बाहेर गावा वरून आलेल्यांना आणण्यासाठी नागरिक हे पुणे रेल्वे स्टेशन मध्ये जाताना नागरिकांना आप आपली वाहने घेऊन जावे लागते
नागरिकांनी वाहने व्यवस्थीत पार्किंग करावी व वाहतूक अडथळा होऊ नये आणि पुणे रेल्वेला उतपन्नासाठी ठेकेदार पद्धतीने पार्किंग चालवायला देण्यात आले,
ठेका देताना करारात अटि व शरती घालण्यात आल्या आहेत परंतु आज पार्किंग ठेकेदार नियमावली पायदळी तुडवून नियमा पेक्षा जास्त रक्कम नागरिकांनकडून लुटत( Loot) असल्याचे प्रकार सुरू आहे.
अशी चालू आहे लुट
मोटरसायकल चे दोन तासांसाठी 5 रूपये फि आकारणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदार सय्यद अफसर ईब्राहिम हा 20 रूपये घेऊन दिवसाढवळ्या नागरिकांनची लुट करत
असताना रेल्वे प्रशासन मात्र दुर्लक्ष करित आहे, सदरील पार्किंग ठेकेदाराला काळया यादित टाकण्यात यावे
व नागरिकांची आर्थिक पिळवणूक केल्या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंदविण्यात यावा अन्यथा संघटने मार्फत मोठया प्रमाणात आंदोलन करण्यात येईल
अशी मागणी अॅनटी करपशन सोसायटीचे अध्यक्ष वाजिद एस खान यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हणटले आहे ..