ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

घरगुती गॅस’वर आजपासून मोजावे लागणार ज्यादा पैसे

Advertisement

(Lpg gas price) केंद्र सरकारने घरगुती वापरातील गॅस सिलिंडर च्या दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

(Lpg gas price) मुंबई : आज मध्यरात्रीपासून (मंगळवार) घरगुती वापराचा गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार ,

मुंबईमध्ये गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना आता ७६९ रुपये मोजावे लागणार आहे .

डिसेंबर नंतर सिलिंडरच्या किमतीमध्ये झालेली हि चौथी दरवाढ आहे.

कोरोना काळात टाळेबंदी मध्ये देशभरात डिझेल ,पेट्रोल ,एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते.

इंधन दर हे जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित करण्यात येतात .

गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने आढावा घेण्यात येतो .

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर व चलन नुसार कंपन्या किरकोळ विक्रीसाठी इंधन दर ठरवतात .

Advertisement
lpg-gas-price-hiked-by-rs-50-per-cylinder-from-15-february-midnight

सध्या अनुदानित गॅस सिलिंडर चा दर ७१९ रुपये आहे .त्यामध्ये आज मध्यरात्रीपासून ५० रुपयांची वाढ होणार आहे.

एप्रिल २०२० ला गॅस सिलिंडरचे दर ७८९.५० रुपयांवर पोहोचले होते . त्यानंतर गॅस सिलिंडर मध्ये २०० रुपयांची कपात करण्यात आली होती.

मात्र गॅस सिलिंडरच्या किमती हे डिसेम्बर पासून पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे .

१ डिसेंबर २०२० रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागले होते .

४ फेब्रुवारी २०२१ रोजी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

१६ फेब्रुवारीपासून पुन्हा गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे.

Share Now