ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

एका किन्नरने लग्न करून मिळविला सुन होण्याचा मान

Advertisement

(Man get married with Kinner)बातमी सोशल मिडीयावर वायरल,

(Man get married with kinner) सजग नागरिक टाइम्स : आपण अनेक अनोखे लग्न सोहळे बघितले असतील कधी लग्नात अफाट खर्च केल्यामुळे तर कधी नववधुला घ्यायला नवरदेव हेलिकॉप्टरने आला असेल ,

यासह अशा विविध कारणांमुळे लग्नसोहळा लक्षात राहतो किंवा चर्चेचा विषय बनतो,

मात्र एका किन्नरने पुरुषांसोबत रीतसर रुढी परंपरा पाळुन लग्न केले असे तुम्हाला सांगितले तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही .

मात्र हा प्रकार मनमाड शहरात घडला असुन येथील किन्नर असलेल्या महंत शिवलक्ष्मी यांनी येवला तालुक्यातील मातुलठाण येथील संजय झालटे यांच्याशी रीतिरिवाज प्रमाणे मंदिरात घरच्या मंडळीच्या उपस्थितीत लग्न केले असुन सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.

वाचा : अखेर इनामदाराच्या शाळेने भरले लाखो रुपये प्रॉपर्टी टॅक्स.

man get married with kinner

आम्हाला दोघांनाही लग्न करण्याचा अधिकार असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे .

त्यामुळे कोण काय म्हणत याकडे आम्ही लक्ष देत नाही.असे स्पष्ट मत महंत शिवलक्ष्मी व त्यांचे पती संजय यांनी व्यक्त केले.

असं म्हणतात प्रेम कधीही कोणावरही कुठेही होऊ शकते प्रेम ना धर्म बघतो ना जात ना समाजातील रूढी परंपरा एकदा जर प्रेम झाले तर त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी प्रेमी युगलांची असते.

Advertisement

सोशल मीडियावर ओळख व नंतर प्रेम आणि दोन्ही परिवाराने एकत्र येऊन समाजाच्या नाकावर टिच्चून लाऊन दिलेले लग्न असा प्रवास आहे.

तो महंत शिवलक्ष्मी यांचा सुरवातीला टिकटॉक या सोशल मीडियावर व्हिडीओ बघून ओळख झाली व त्यानंतर प्रेम आणि त्यानंतर झाले ते डायरेक्ट लग्नच केले .

येवला तालुक्यातील संजय झालटे या तरुणाने टिकटॉक या सोशल मीडियावर प्रथम शिवलक्ष्मीला बघितलं दोघांचीओळख झाली,

नंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले मात्र लग्न करणार तर तुझ्याशिच असा पणच संजय यांनी मनाशी बांधला आणि नंतर दोन्ही परिवारातील सदस्यांनी एकत्र बसुन रीतिरिवाज प्रमाणे लग्न लावून दिले.

नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिरात हा लग्नसोहळा परिवारातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला या लग्नाबद्दल कोणालाही माहिती दिली नाही आणि एकदम कमी लोकांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने हा विवाह सोहळा पार पडला.

या विवाहाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली मात्र आम्ही दोघे व आमच्या परिवारातील सर्व सदस्य यांना हे लग्न मान्य असल्याने लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करत एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला.

किन्नरलाही जगण्याचा अधिकार असुन तेही आपल्या मर्जीने लग्न करू शकतात असेच या दोन्ही परिवाराने दाखवुन दिले आहे.

वाचा : कोंढव्यातील नगरसेविकेच्या मुलाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार,

Share Now

One thought on “एका किन्नरने लग्न करून मिळविला सुन होण्याचा मान

Comments are closed.