Maulana is sent to jail :विनयभंगाच्या गून्ह्यातील फरार मोलवीस पिंपरीत अटक, वानवडी पोलिसांची कारवाई

सजग नागरिक टाइम्स : Maulana is sent to jail ; पुणे -;महिलेवर पाळत ठेवून तिची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या
मन्सूर चंदुलाल इनामदार (वय 38 राहणार अश्रफ नगर कोंढवा, मूळ राहणार फलटण)
या मौलानाला लष्कर न्यायालयाने एक वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती ,
सदरील कारवाई ही लष्कर न्यायालयाचे न्यायाधीश देशपांडे यांनी केली होती ,
इनामदार यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये एका महिलेचा पाटलाग करून तिच्या घरावर पाळत ठेवली होती,तसेच तिची सोशल मीडियावर बदनामी केली होती ,
या प्रकरणी एका पीडित महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती,
हेपण वाचा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढव्यातील मौलानाला एका वर्षाची शिक्षा
पोलिसांनी मौलानावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याच्या विरुद्ध लष्कर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते,
वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 490/ 2016 भादवि कलम 354 D
प्रमाणे केस दाखल झाले होते,
केस नंबर आरसीसी 665/2017 आरोपी नामे मोहम्मद मन्सूर चंदुलाल इनामदार,
या आरोपीस अपील दाखल करण्याचा जो कालावधी दिला होता त्या कालावधीत त्याने अपील दाखल केले नाही,
तसेच अपील कालावधी संपल्यानंतर सदर आरोपी हा फरार झाला होता,
त्यास दिनांक 5 /11/19 रोजी पोलिसांना प्राप्त माहितीवरून सदर आरोपीस पिंपरी मधून अटक करण्यात आले आहे.
वानवडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीकुमार पाटील,गुन्हे चे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस हवलदार घुले बक्कल नं.4118,व पोलिस नाइक जाधव बक्कल नं.7836 यांनी 354 ड मधील
फरार आरोपी मोहम्मद मन्सूद चंदुलाल इनामदार यास एन बी डब्ल्यू वारंटवरुन पिंपरी येथे जावून पकडले.
व त्यास लष्कर न्यायालयात हजार केले असता त्यास न्यायालयाने न्यायालयीन कस्टडी दिली व जेल मध्ये पाठवले,
मागील बातमी :तृप्ती देसाई व आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार दाखल
सजग नागरिक टाइम्स : तर प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव मोहिते यांच्या तक्रारी वरून Trupti Desai विरोधातही गुन्हा दाखल.
पुणे : तृप्ती देसाई यांनी (MLA Bachchu Kadu) आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्न्नावर तुम्ही गप्प का ? असा सवाल फेसबुकवर विचारला होता
यावरून आमदार बच्चू कडू समर्थकांनी कमेंट बॉक्स मध्ये टीका टिप्पण्णी केली होती, अधिक वाचा