MIM Student wing news : नवी मुंबई येथे एम आय एम विद्यार्थी आघाडी चे प्रशिक्षण शिबिरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित
MIM Student wing news : सजग नागरिक टाइम्स :
नवी मुंबई : १७ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे एम आय एम विद्यार्थी आघाडी चे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी एम आय एम चे विचार घराघरात पोहचविण्यासाठी विचार विमर्श करण्यात आले तसेच एम आय एम पार्टीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पद वाटप करण्यात आले .
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते एम आय एम विद्यार्थी आघाडीचे मौलाना शाहरुख अजित खान यांना पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले .
या कार्यक्रमात माझी आमदार वारीस पठाण , माझी आमदार फैय्याज अहेमद ,
मार्गदर्शक प्रभाकर पारधे ,विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात,
उपाध्यक्ष शहजाद खान, महासचिव शाहनवाज खान, साचिव प्रशांत वाघमारे , सह सचिव रुमान राझवि ,
नॉर्थ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साणिर सय्यद, मराठवाडा अध्यक्ष मझर पठाण ,
मराठवाडा कार्य अध्यक्ष अझीम पटेल ,व मुंबई , औरंगाबाद, मालेगाव, नंदुरबार, धुळे, पुणे ,
परभणी , नांदेड , रायगड, नवी पनवेल येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.