Homeब्रेकिंग न्यूजमिलिंद एकबोटेचे निघाले अरेस्ट वारंट

मिलिंद एकबोटेचे निघाले अरेस्ट वारंट

Milind ekbote arrest warrant : मिलिंद एकबोटेचे निघाले अरेस्ट वारंट

milind ekbote arrest warrant

सजग नागरीक टाईम्स,Milind ekbote arrest warrant :पुणे: कोरेगाव भीमा येथे ०१ जानेवारी २०१८ रोजी दोन गटात जातीय तणाव झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता,

 सदर घटणे बाबत कलम ३०७,१४३,१४७,२९५ (अ)४३६,११७,१५३ (अ)१२० (ब) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणां कायदा

१९८९ व २०१५ चे तसेच आर्म अँक्टचे कलमान्वये शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे मीलींद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला होता.

(Shivajinagar court)शिवाजीनगर सत्र न्यायालयाने एकबोटे यांना  पकडण्याचे वाँरंट आज जारी केले.

एकबोटे यांना अटक करण्याकरिता पोलीस अधिक्षक सुवेज हक यांनी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत व पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

रिलेटेड बातमी : मिलिंद एकबोटेचे जामीन मंजूर(Bhima Koregaon issue)

Bhima Koregaon violence issue:भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे

यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळल्यानंतर एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती .

मिलींद एकबोटे यांच्यावर एक जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. १४ मार्च पासून एकबोटे हे कोठडीत होते.

(Pune Sessions Court) आज पुणे सत्र न्यायालयाने २५००० रुपयाच्या जात मुचलक्यावर एकबोटेचे जामीन मंजूर केले.

व्हिडीओ पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा

रिलेटेड बातमी :भीमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू

सजग.नागरिक टाइम्स: Bhima Koregaon Case:पुणे, 23 एप्रिल :भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट

या 17 वर्षाच्या मुलीचा मृतदेह राहत्या घराजवळ विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथे दलित आणि हिंदूत्ववादी गटामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला होता.

या प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

हेपण वाचा : भीमा कोरेगाव दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

मिलिंद एकबोटेंना अटक आणि नुकताच जामीन मिळाला आहे. या दंगलीची पूजा सकट ही साक्षीदार होती.

तिचा मृतदेह घराबाहेरील विहिरीत आढळून आला. पूजा हिचा घातपात झाला असल्याची शक्यता पूजाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

तिच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चौकशीची मागणी केली आहे.

एकमेव साक्षीदार असलेल्या पूजाला आणि तिच्या  कुटुंबियांना धमक्या येत असल्याची तक्रार ही त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular