Homeताज्या घडामोडीसतत होणाऱ्या पावसामुळे मोमिनपुरा कब्रस्तानाची भिंत कोसळली

सतत होणाऱ्या पावसामुळे मोमिनपुरा कब्रस्तानाची भिंत कोसळली

सुदैवाने भिंत पडताना तेथे कोणीही उपस्थित नसल्याने जीवित हानी टळली.

Mominpura kabristan news : सजग नागरिक टाइम्स :

पुणे : काल पासून सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोमिनपुरा कब्रस्तानाची भिंत कोसळली आहे सदरील भिंत हि १० ते १५ फुट उंचीची असून खूप जुनी आहे.

या भिंती च्या मागूनच एक रस्ता जात असून सुदैवाने भिंत पडताना तेथे कोणीही उपस्थित नसल्याने जीवित हानी टळली.

सदरील भिंत पडल्याने जंगली कुत्री हे आत जाऊन डेट बॉडी ची नासधूस करण्याची अधिक संभावना आहे.

Mominpura kabristan news

तसेच या परिसरात दारुड्यांचा धिंगाणा चालत असून त्यांच्यामुळे कब्रस्तान मध्ये अधिक नासधूस होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले

सदरील भिंत लवकरात लवकर बांधण्यासाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय व त्याचे अधिकारी लक्ष देतील का ? यावर नागरिकांचे लक्ष लागून आहे .

रिलेटेड बातमी : करोडो रूपये खर्च कर बनाया कब्रिस्थान झाडियों के गिरफ्त मे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular