(mp sanjay raut) मुंबई : एका उच्चशिक्षित महिलेन केलेले छळवणुकीचे आरोप शिवसेना खासदार संजय राउत यांनी फेटाळून लावले .
याचिकादार महिलेने तिच्या कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या गैरसमजातून त्यांनी विनाकारण माझ्यावर आरोप केले आहे.
असा दावा खासदार संजय राउत यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
खासदार संजय राउत यांनी छळ केल्याबाबतची तक्रार संबंधित महिलेने न्यायालयात दाखल केली होती.
न्यायमूर्ती मनीष पितळे व न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
‘२०१३ पासून माझा छळ सुरु आहे .माझ्या मागे माणसे लावली असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे.
परंतु पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखलच घेतली नाही. कारण खासदार संजय राउत यांच्या विरोधात मी आरोप केले आहे.
आता मी याविरोधात कोर्टात येण्याच बळ जमवल आहे .
सप्टेंबर-२०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगासमोर सुनावणी झाल्यानंतर आयोगाने चौकशीचे आदेश दिले.
तरीही पोलीस उपायुक्तांकडून कारवाईच झाली नाही.’असा युक्तिवाद अॅड. आभा सिंग यांनी सदरील याचिकाकर्त्या महिलेच्या वतीन केला .