मुस्लिम समाज मूक मोर्चाच्या तयारीत

Reservation News : 5% शैक्षणिक आरक्षण मिळावे व गौरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांनवरील हल्ले थांबावे म्हणून.

muslim-community-soon-to-launch-a-silent-march-to-reservation

Reservation issue : सजग नागरीक टाईम्स : पुणे, मुस्लिम समाजाला 5% शैक्षणिक आरक्षण देऊन हि सरकार ते आरक्षण देण्यास असमर्थता दाखवत आहे.

तसेच गौरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांना जिवे मारण्यात येत आहे.

या सर्वांवर मुस्लिम समाजाचा दिवसेंदिवस रोष वाढतच चालला आहे .

ज्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास मुस्लिम समाजाचे मोठे योगदान होते त्या मुस्लिम समाजाला सवतीच्या नजरेने पाहिले जाते.

Advertisement

या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करत आता मुस्लिम समाज एकत्र येत आहे.त्याची सुरूवात आता पुणे शहरातुन होत आहे .

sajag addsajag-advertisement-offergolden night sex power supliment

मुस्लिम समाजावर होणारे हल्ले व कोर्टाने 5% आरक्षण देण्याचे आदेशाला सरकारला विसर पडल्याने त्याची जाणीव करून देण्यासाठी मुस्लिम समाजातील संघटना,ट्रस्ट,मंडळे एकत्रित येत आहे.

सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा .

यासाठी मोठ्या प्रमाणात बैठकाही सुरू झालेल्या आहेत .सदरील मोर्चा कोणा धर्माच्या व सुदायाच्या विरोधात नसून मुसलमांच्या हक्कासाठी आहे.

Advertisement

या मोर्चात अन्य धर्मिय बांधव मोठया प्रमाणावर सहभागी होऊन साथ देणार आहे. मुस्लिम महा मूक मोर्चा काढायाची जंगी तयारी सुरू झाली आहे .

येत्या काहि दिवसा मध्ये मुस्लिम बांधवाकडून मुस्लिम महा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.