ताज्या घडामोडीपुणे

कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द!

Advertisement

(Nagarsevak Avinash Bagwe) २०१७ साली दाखल करण्यात आले होते कोर्टात प्रकरण.

(Nagarsevak Avinash Bagwe) सजग नागरीक टाइम्स प्रतिनिधी पुणे:

प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेवक अविनाश बागवे यांचे पुण्यातील न्यायालयाने पद रद्द केले आहे.

पुणे महानगरपालिका २०१७ च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये प्रभाग क्र. १९ अ” मधून एकूण ८ उमेदवार निवडणूक लढवित होते.

सदरचा प्रभाग हा अनुसूचित जातीकरीता राखीव होता.

तर निवडणूकीमध्ये उभे असलेले उमेदवार एडवोकेट भूपेन्द्र रामभाऊ शेडगे हे मनसे पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून उभे होते.

आणि अविनाश बागवे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार होते.

विडीयो पहा

४ फेब्रुवारी २०१७ रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी अविनाश बागवे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये व नामनिर्देशन फॉर्ममध्ये दिलेली माहिती ही विसंगत व अपूर्ण तसेच खोटी असल्या कारणाने शेंडगे यांनी निवडणूक अधिकारी यांचेकडे रितसर हरकत उपस्थित केली होती.

परंतु त्यांची हरकत ही निवडणूक अधिका-यांनी फेटाळून लावली होती .

त्यानंतर निवडणूक होवून त्यामध्ये अविनाश बागवे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.

Advertisement
17जुलै पर्यंत स्थगिती मिळाली

सदरील निवडणूक प्रक्रिया व वरील अर्ज छाननीच्या वेळी घेतलेली हरकत विचारात घेण्यात आलेली नसल्यामुळे सदरबाबत भूपेंद्र शेडगे यांनी मुख्य लघुवाद न्यायालय,

पुणे येथे निवडणूक याचिका क्रमांक ५/२०१७ ही दाखल केली होती.

निवडणूक याचिकेमध्ये झालेल्या साक्षी, तपासणी, उलटपासणी, पुरावे व दाखल कागदपत्रे या सर्व बाबींचा विचार करून,

तसेच कायदयाचे तरतुदींचे विचार करता न्यायालयाने २९ जून २०२१ रोजी आदेश पारीत करून

अविनाश बागवे यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे
१९६९ चे कलम १०(१) (डी) अन्वये अपात्र ठरविले.

व त्यांचे नगरसेवक पद हे रद्द केले असल्याचे एडवोकेट भुपेंद्र शेडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सदरील प्रकरणात एडवोकेट नरेश गायकवाड, एडवोकेट रफिक शेख, योगेश डावरे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले .

निवडणूकीला ६ महिने असतानाच असा निकाल आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

वाचा : पुणे एम आय एम च्या प्रयत्नांना आले यश ,पुणे शिक्षण उपसंचालकांनी घेतली दखल

Share Now