ताज्या घडामोडी

शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करताना कलाकाराचा मृत्यू .

Advertisement

Nagpur news today :शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करताना Nagpur येथे कलाकाराचा मृत्यू .

Nagpur news today actor suicide

Nagpur news today :शेतकरी आत्महत्येचा देखावा करणं नागपुरातील कलाकाराच्या जीवावर बेतलं.

शोभायात्रेत गळफास घेतल्याचा देखावा सादर करताना खरोखरच फास बसून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील रामटेकमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Advertisement

त्यामध्ये एका ट्रॅक्टरवर शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करण्यात आला होता. 27 वर्षीय मनोज धुर्वे हा कलाकार गळ्यात दोर बांधून देखावा सादर करत होता.

शोभायात्रा गांधी चौक ओलांडून पुढे जात असताना चालत्या ट्रॅक्टरमध्येच मनोजला गळफास बसला आणि तो खाली कोसळला.

नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

Share Now

Leave a Reply