ताज्या घडामोडी

पूरग्रस्तांना मदतीसाठी नायब तहसीलदारांनी स्वता पाठीवर वाहून नेली अन्नधान्याची पोती,

Advertisement

नायब तहसीलदारांनी स्वता पाठीवर वाहून नेली अन्न धान्याची पोती(help flood victims)

Naib tahsildars carry food grains on their backs to help flood victims,

सजग नागरिक टाईम्स : प्रतिनिधी पुणे (help flood victims)महाराष्ट्रातील सांगली येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

शासन पातळीवर ही मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आ हे.

त्यातच निगडी येथील अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्न धान्याची पोती रवाना करण्यात आली आहे.

ही अन्नधान्याची पोती स्वतःच्या खांद्यावर वाहून नायब तहसीलदार तथा अन्नधान्य परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Advertisement

भाजप नगरसेविका गीता सुतार व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद

अनेक शासकीय अधिकारी असे असतात की, ते त्यांच्या हाता खालील कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतात.

पण, निगडी येथील अन्न धान्य अ परिमंडल अधिकारी तथा नायब तहसीलदार दिनेश तावरे यांनी पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यासाठी कोणतीही दिरंगाई केली नाही.

परिस्थितीचे भान समजून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या धान्याची पोती स्वत: खांद्यावरून वाहून नेली.

आपलं पद बाजूला ठेऊन कर्मचाऱ्यांबरोबर ग्राउंड लेव्हलला काम करणारे असे अधिकारी क्वचित आढळतात.

तावरे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.यामुळे सगळीकडे त्यांची प्रशांक्षा सुरू आहे,

पूरग्रस्त बांधवाना सुका शिधा,कपडे व ब्लॅंकेटची मदत(Help)

Share Now