नंतर मल्हारने राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक ऑफ 26/11’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. आता त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, जे त्याने वडील नाना पाटेकर यांच्या नावाने सुरू केले आहे. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे- नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस. नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांनी एकमेकांना घटस्फोट दिलेला नसून, दोघेही खूप दिवसांपासून वेगळे राहत आहेत. मल्हार त्याच्या आईच्या खूप जवळ आहे.