(Nawab Malik)नवाब मलिक यांचा शिवसेनेवर निशाणा
आज शिवसेना लाचारसेना झाली आहे. त्यामुळेच गुजरातमध्ये उद्धव ठाकरे गेले होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेनेने भाजपासमोर लोटांगण घातले आहे हेच उद्धव ठाकरे यांच्या जाण्याने सिद्ध झाले आहे असेही Nawab Malik यांनी म्हटले आहे.
अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एनडीएचे घटकपक्ष बोलावण्यात आले.
यावरुन अमित शाह अडचणीत आहेत हे दिसून येत आहे. कालपर्यंत गांधीनगरमध्ये कुणीही प्रचाराला यायचं नाही ही भाजपाची भूमिका राहिली होती.
परंतु आज सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना बोलावून घेण्यात आले यावरुन अमित शाह हे अडचणीत आहेत हे स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले