ताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मोर्चा काढून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

Advertisement

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग 27 मधील हरकानगर ,कासेवाडी , लोहियानगर या भागातील मूलभूत समस्यांपासून वंचित असलेल्या नागरिकांना सहुलत मिळावे म्हणून आंदोलन करण्यात आले.

यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या , दूषित पाणी ,
वीज , ड्रेनेज लाईन , अस्वच्छता , रस्त्यावरील खड्डे असे आदी समस्यांविषयी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे मनपा सह . आयुक्त गणेश सोनुने यांना निवेदन
देण्यात आले .

यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे कँटोन्मेंट मतदार संघाचे निरीक्षक रवींद्र माळवदकर , जुबेर बाबू शेख , शांतीलाल मिसाळ , विक्रम मोरे , नरेश जाधव ,दत्ता जाधव , युसुफ शेख ,

नरेश पगडाल्लू , फिरोज तांबोळी , हरीश लडकत , इस्तीयाक बागवान , राहुल तांबे ,किरण जगताप , पोपटराव गायकवाड ,

संजय गायकवाड निकिता जाधव , दिलशाद शेख , शरीन शेख,योगिता लडकत , आदी महिला कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित होते

Advertisement

यावेळी रविंद्र माळवदकर म्हणाले की , हाकेच्या अंतरावरच क्षेत्रीय कार्यालय असताना देखील नागरिकांच्या समस्यांची दखल घेतली जात नाही .

भाजपची सत्ता असताना देखील अमानुषपणे नको ती बिले पास करून लोकांना त्रास देण्याचे काम याठीकणी केले जात आहे .

पुढील काळात नगरसेवकांनी या समस्येचे निवारण केले नाही तर पुढच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रविंद्र माळवदकर यांनी दिला .

यावेळी जुबेर बाबू शेख म्हणाले की , क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आळशीपणाला व निष्काळजीपणाला कंटाळून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे .

यामध्ये लोकांच्या घरात व दारात गटारगचे पाणी , असे अनेक समस्या आज भेडसावत आहे . आम्ही पक्षाच्या वतीने गल्लीबोळात ट्यूबलाईट बसविले होते मात्र ते ट्यूबलाइट देखील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते बंद केल्या .

Share Now