News Updatesरमजान स्पेशललेख

रोजा साठी आवश्यक सहेरी

Advertisement

Necessary Saheri for Roza : रोजा साठी आवश्यक सहेरी : रमजानुल मुबारक – ५

Necessary Saheri for Roza

Necessary Saheri for Roza : सजग नागरिक टाइम्स : रमजान महिना प्रसिद्ध आहे तो त्यातील महिनाभराचे रोजे अर्थात उपवासा साठी .

हिजरी सन दोन मध्ये रमजान महिन्यातील रोजे फर्ज (अनिवार्य ) केले गेले .

प्रत्येक सुदृढ मुस्लिम स्त्री पुरुषाने महिनाभराचे रोजे करणे आवश्यक आहे . मुस्लिम धर्माचे रोजे आणि इतर धर्मीयांचे उपवास यामध्ये मूलतः काही फरक आहे .

जैन धर्मात निरंकार उपवास केले जातात . हिंदूधर्मीय उपवासाची पद्धत वेगळी आहे .

इस्लामधर्मीय रोजे धरण्याबाबत हजरत पैगंबरांनी जे काही संकेत दिले आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक आहे .

यासाठी रात्रीच्या शेवटच्या टप्प्यात (पहाटे) उठून जेवण केले जाते .

त्याला सहेरी खाणे म्हणतात . आपल्या दैनंदिन नियमित जेवणा सारखेच ते जेवण असते . रोजासाठी सहेरी खाणे आवश्यक आहे .

पावित्र्याचा परिपाक -रमजान

E-Business-card

सहेरीचे जेवण न करता रोजा धरता येत नाही . सहेरी खाणे म्हणजे भरपेट जेवण नव्हे . दोन चार घास जरी खाल्ले तरी पुरेसे होते .

रमजानमध्ये बऱ्याच वेळा पहाटे लवकर जाग येत नाही . कधी कधी उशीर होतो आणि सहेरीची वेळ संपत आलेली असते .

अशावेळी एक-दोन खजूर खाऊन किंवा ग्लासभर पाणी पिऊन सुद्धा रोजा धरता येतो .

एकदा सहेरीची वेळ समाप्त झाल्यानंतर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे अन्न-पाणी वर्ज्य असतं .

सहेरीबाबत हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि सहेरी खात जा, त्यामध्ये बरकत आहे.उपवास धरल्याने शरीरामध्ये उष्णता, ऍसिडिटी निर्माण होते.

ती निर्माण होऊ नये म्हणून सहेरी केली जाते. रमजान पर्वामध्ये इस्लामी मोहल्ल्यातील वातावरण वेगळेच असते .

घराघरातून पहाटे माणसं उठून जेवण करतात . कुरआनशरीफची तिलावत केली जाते .

फजर ची नमाज आदा केली जाते . अल्लाहचे आभार व्यक्त केले जातात .आजारी लोकांना रोजामध्ये सूट देण्यात आलेली आहे .

असा आजार की जो उपवास केल्याने बळावण्याची शक्यता आहे, ज्याला असेल त्या लोकांनी रोजी धरू नयेत.

Advertisement

आजारपणातून बरे झाल्यानंतर त्यांनी रोजे पूर्ण करावेत.शरीरासाठी उपवास आवश्यक आहे.

वैद्यकीय शास्त्रातसुद्धा उपवास अर्थात रोजे करण्याबाबत डॉक्टर सल्ला देतात. सहेरीसाठी प्रामुख्याने दूध केळीचे शिकरणचे सेवन केले जाते .

त्यामुळे जास्त तहान लागत नाही .रोजे धरल्याने शरीराला भुकेची जाणीव होते . शरीर शुद्धी पण होते .

आपल्याला भूक लागल्यानंतर अन्नाची आवश्यकता भासते . भुक लागल्यावर अन्नाचे महत्त्व कळते .

आज आपण भुकेले असल्याने आपल्याला जशी अन्नाची गरज आहे तशीच ती इतर माणसांना सुद्धा असते .

म्हणून कठीण प्रसंगी भुकेल्यांसाठी अन्नदान करण्याची पद्धत किंवा संस्कृती आपल्याकडे रुढ आहे. अन्नदान करताना फक्त माणूस म्हणून समोरच्या व्यक्तीकडे पाहिले जाते .

Lockdown च्या काळात Smile Foundation तर्फे गरजुंना रेशनकिट ची मदत

mk-digital-seva
https://mkdigitalseva.com/

ती कोणत्या जातीची, कोणत्या धर्माची याचा विचार कधीच केला जात नाही .लॉक डाऊन मुळे प्रत्येक गावात गरजू माणसांना मदत केली जात आहे.

मदत करण्यासाठी सर्वधर्मीय नागरिकांचे हजारो हात पुढे येत आहेत. कुणी शिधा देत आहे. कोणी तयार अन्नाची पाकिटे देत आहे. ही सर्व धडपड जगण्यासाठी सुरू आहे.

प्रत्येक जण जगला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा आहे. एका छोट्याशा वायरसने जगाचे चित्र बदलून टाकले आहे.

अशा या कठीण प्रसंगात सर्वजण एकमेकांना मदत करीत आहे आणि हीच खरी मानवता (इन्सानियत) आहे.

रोजामुळे अशा गरजू लोकांच्या गरजांची जाणीव प्रत्येक मना मनामध्ये रुजते . अशा लोकांना मदत करण्याची वृत्ती आपल्या अंगी निर्माण होते .

रोजा हा प्रार्थना म्हणजे इबादत म्हणून केला जाणारा एक संस्कार आहे .या संस्कारातून एकमेकांना मदत करून एकमेकाची सुख दुःखे वाटून घेण्याचा शिकवण दिली जाते.

भारतासारख्या विविध धर्मीय देशांमध्ये सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारचे रोजे अर्थात उपवास करतात. पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी सर्वांचा हेतू हा एकच आहे.

तो म्हणजे मानवतेच्या मूल्यांची जोपासना करणे. यासाठी परमेश्वराने सर्वांना शक्ती द्यावी हीच माहे रमजान निमित्ताने प्रार्थना .( क्रमश 🙂


सलीमखान पठाण : 9226408082

Share Now