Homeताज्या घडामोडीटोइंग टेंपोचा गैरप्रकार, भाच्याने केला मामावर वार

टोइंग टेंपोचा गैरप्रकार, भाच्याने केला मामावर वार

लाखोंचा धंदा हातानी निसटला भाच्याची गाडी हटवून पैसे कमविण्यास मामा वेगात सुटला?

file photo

सजग नागरिक टाइम्स: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एक टेंडर निघाले त्या टेंडर चे उद्देश हे होते की वाहतुक पोलिसांच्या मदतीने नोपार्कींग मधिल वाहने उचलने व त्यांना २३६ रूपयाचे दंड आकारणे,यासाठी टेंपो, लेबर व इतर खर्च हे ठेकेदाराने उचलने व बदल्यात पिंपरी मनपा त्या ठेकेदाराला ठराविक पैसे देईल.

पण याचा गैरफायदा घेणारे यात शामिल झाले व त्यांनी नागरिकांची लुट चालु केली.अव्वाचे सव्वा रुपये मागुन ते वसुल करु लागले. अश्याच एका प्रकरणात प्रवीण देवदास जगधने सापडला त्याने टोइंग केलेल्या वाहणांचे पैसे स्वतःच्या ओनलाइन अकाउंटवर घेतले हे उघडकिस येतास मनपाने त्याचा टोइंग टेंपो सस्पेंड केला.

माझी टेंपो हटवून मामाने त्याचे ३ टेंपो लावले व मामा लाखो रुपये कमवू लागला, माझी टेंपो हटविण्यात मामा कारणीभूत असल्याच्या संशयावरून प्रवीणने आपल्या मामावरच कुऱ्हाडीने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी प्रवीण देवदास जगधने ( वय २८ , रा . राजेवाडी ) याला अटक केली आहे . जगधने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून , त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे .

याबाबत अभिषण दादू रणदिवे ( वय ३८ , रा . राजेवाडी ) यांनी फिर्याद दिली . ही घटना रणदिवे यांच्या घरात रविवारी दुपारी एक वाजता घडली .रागातून तो रविवारी रणदिवे यांच्या घरी हातात कुन्हाड घेऊन आला .

रणदिवे यांच्या पाठीमागून येऊन आता तुला खल्लास करतो , असे म्हणून त्यांच्या डोक्यात कुन्हाडीने वार केला , मी इथला भाई आहे , असे मोठमोठ्याने ओरडून हातातील कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत पसरवली .

समर्थ पोलिसांनी प्रविणला अटक केली असून , सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular