ताज्या घडामोडी

पुण्यात उद्यापासून (शनिवार) रात्रीची संचारबंदी;

Advertisement

Curfew in Pune: नेमकं काय सुरू, काय बंद राहणार?

(Curfew in Pune) महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील सात दिवस पुणे जिल्ह्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

(शनिवार) उद्यापासून या संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. (Night Curfew In Pune)

पुण्यातील करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक झाली.

Night curfew in Pune from tomorrow Saturday

विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील महापालिकांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनला विरोध करण्यात आला.

संपूर्ण लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध लादण्यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानंतर पुढील सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. सात दिवसांनंतर पुन्हा आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं सौरभ राव यांनी सांगितलं.

संचारबंदी अशी असेल

Advertisement

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

३० एप्रिलपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच. मात्र, परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार

आठवडे बाजार चालू असेल

(पीएमपीएल) बसेस पुढील सात दिवस बंद. एसटी सेवा सुरू राहणार

रेस्टॉरंट, हॉटेल, बार, मॉल आणि चित्रपटगृहे बंद राहणार.हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहणार

उद्योग किंवा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जाणार

संचारबंदीच्या काळात खासगी कार्यालयांमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचे पत्र दिले असेल तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत होणार, तर विवाह समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत होणार,

उद्याने ही पूर्वीप्रमाणे सकाळी सुरू राहणार

सांस्कृतिक, राजकीय, सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांना बंद

वाचा : पुण्यातील छ.शिवाजी मार्केट व फॅशन स्ट्रीट मधील आगीची उच्चस्तरीय समिती गठीत करून तत्परतेने चौकशी करण्याची मागणी .

Share Now