Homeताज्या घडामोडीपुणे एन जी ओ फेडरेशनच्या वतीने समाज सेवकांचा व ५० विविध संघटनांचा...

पुणे एन जी ओ फेडरेशनच्या वतीने समाज सेवकांचा व ५० विविध संघटनांचा सत्कार समारंभ

Sajag Nagrikk Times :पुणे : गेली दोन वर्षांपासून कोरोना व महामारीमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे त्यातच अनेक लोकांचे रोजगार गेले अनेकांवर भूकमारीची वेळ आली अशातच पुण्यातून अनेक संघटना लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या जशी जमेल ती मदत केली अशा विविध संघटनांचा सत्कार पुणे एन जी ओ फेडरेशनच्या वतीने करण्यात आला त्याच बरोबर या कार्यक्रमात महिलांसाठी मीना बाजार चे आयोजन यास्मिन शेख याच्या वतीने करण्यात आले तसेच खुद्दाम ए मिल्लत मॅरेज ब्युरो मार्फत मुस्लिम वधुवर सूचक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले.

On behalf of Pune NGO Federation, felicitation ceremony for social workers and 50 different organizations

या कार्यक्रमात कोंढव्यातून १८ संघटनांनी सहभाग घेतला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेविका हसीना इनामदार व समाजसेवक हाजी फिरोज शेख तसेच पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष जुबेर राशिद खान यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका हसीना इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिला सशक्तीकरण करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी त्यांनी खंबीर पाठिंबा जाहीर केला तसेच फेडरेशनचे अध्यक्ष रियाज मुल्ला यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाचे कौतुक केले त्याचबरोबर समाजसेवक हाजी फिरोज शेख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत लवकरच येत्या आठ दिवसात बेरोजगारांसाठी नोकरी महोत्सव घेणार असल्याचे सांगितले त्याच बरोबर या फेडरेशनला शुभेच्छा देत आपण सोबत काम करण्याचे आश्वासन दिले तर जुबैर रशीद खान यांनी फेडरेशनचे अध्यक्ष रियाज मुल्ला आणि सहकाऱ्यांचे आभार मानले त्याचबरोबर महिलांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात निर्भीड पत्रकार नदीम इनामदार व वाजिद खान, रहीम सय्यद यांचा देखील सत्कार करण्यात आला कोरोना विषयी जण जागृती करणारे बंधू विवेक सरपोतदार व योगेश सरपोतदार यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष रियाज मुल्ला यांनी आलेल्या पाहुण्यांचे व संघटनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रोफेसर चांद शेख यांनी केले तर या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी फैसल शेख रिश्तेवाला, शहेबाज पंजाबी, शमीम खान पठाण, झाकिया खानम, खिसाल जाफरी, अय्याज खान यांनी प्रयत्न केले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular