ईद स्पेशलताज्या घडामोडीपुणे

बकरी ईदच्या दिवशीही ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे पुण्यात नमाज पठण होणार

Advertisement

Facebook Live : २९ मेपासून हा उपक्रम दर शुक्रवारी सुरु आहे.

on-the-day-of-bakra-eid-also-namaz-will-be-recited-in-pune-through-facebook-live

Facebook Live :सजग नागरिक टाइम्स : पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करु नये,

या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मस्जिदमध्ये बकरी ईद (ईद उल अजहा)जुम्मा ची नमाज ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे पठण होईल.

मस्जिदच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून, २९ मेपासून हा उपक्रम दर शुक्रवारी सुरु आहे.

सलग नवव्या आठवड्यात याही शुक्रवारी हा उपक्रम होत आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.

Advertisement
video

या तंत्रामुळे मस्जिदमध्ये गर्दी होत नाही, फक्त इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी
होणे शक्य होते.

दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो. आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली.

आझम कॅम्पस मस्जिदमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद नमाज पठण करणार आहेत,

तर आझम कॅम्पसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत

मागील बातमी : संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी आझम कॅम्पस मस्जीद इमारतीमधील संपूर्ण मजला उपलब्ध

Share Now