One criminal Arrest With Pistol :हिंजवडी,माणगाव येथील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीररित्या गावठी Pistol घेवून फिरणार्या एकाला गुन्हे शाखेच्या दरोडा पथकाने शुक्रवारी ११.३० च्या सुमारास अटक केली.
अभिषेक उमेश पारखी ( वय २० वर्षे रा सुतारवस्ती मानदेवी चाैक हिंजवडी )याला अटक केली आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे शैलेश सुर्वे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती.की एक जण बेकायदेशीर रीत्या गावठी पिस्टल घेवून फिरत आहे.
सजगच्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा
दरोडा पथकाचे कर्मचारी संजय दळवी,सचिन अहिवळे,वैभव स्वामी,संदिप ठाकरे व विल्सन डिसोझा यांच्या पथकाने त्यास सापळा लावून पकडले.
त्याची झडती घेतली असता त्याचेकडे ३५,००० रू किमतीचा गावठी पिस्टल आणी २०० रूपये कीमतीचे १ काडतूस आढळून आले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.