नाल्यात बुडालेल्या युवकास अग्निशमन दलाकडून जीवदान (Fire brigade jawan)

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

लघुशंकेकरिता गेलेला युवक नाल्यात बुडाला होता त्यास अग्निशमन दलाकडून बाहेर काढून जीवदान देण्यात आले,(Fire brigade jawan)

one-youth-life-save-by-fire-brigade-jawan

Fire brigade jawan worknews ; Pune – काल शनिवार मध्यरात्री दोन वाजता एक युवक नाल्यामध्ये बुडाल्याची घटना घडली होती.

हा युवक गणेश पेठेतील बुरडी पुलानजीक लघुशंकेकरिता नाल्याच्या कडेला उभा असताना पाय घसरला व पाण्याने भरलेल्या नाल्यात बुडाला.

सुदैव म्हणजे त्याला पोहायला येत होते. पण पाण्याचा प्रवाह एवढा की हा युवक नाल्यातील एका कप्प्याजवळ अडकला.

यासंदर्भात अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला वर्दि मिळताच मुख्यालयातून जवानांचे पथक रवाना झाले.

Advertisement

हेपण वाचा :कोंढव्यातील जशन व सुफी हाॅटेलवर पोलिसांची कारवाई

जवान पोहोचताच पाण्याचा प्रवाह पाहून त्यांना तातडीने निर्णय घेऊन त्या युवकाला जिवंत बाहेर काढण्याचे आव्हान समोर होते.

परंतू, दलाचे जवानच येणार व मला सुखरुप बाहेर काढणार हा विश्वास त्या युवकाला ही होता.

तातडीने अधिकारी समीर शेख यांनी निर्णय घेऊन जवानांना आदेश दिले व जवान प्रकाश शेलार यांनी प्रवाहात उडी मारत सोबत रशी व बॅटरी घेउन शोध सुरु केला.

Advertisement

आतमध्ये पहिली फेरी मारत काहीच न मिळाल्याने शेलार बाहेर आले.

Advertisement

जरा उसंत घेत पुन्हा डुबकी मारत शोध घेतला असता अडकलेला युवक शेलार यांच्या नजरेस पडला.

हेपण वाचा : मित्राला भेटायला आला अन Lift मध्ये अडकला

युवकाने ही जवानाला पाहताच “फायरब्रिगेड येणार व मी वाचणार हे माहितच होत असे ही म्हणाला.

Advertisement

क्षणाचा ही विलंब न करता युवकास रशी बांधून त्याला सुखरुप बाहेर आणले.

युवक सुखरुप असून त्याला प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

युवकाची फक्त मानच पाण्याबाहेर होती व अशा परिस्थितीत तो फोनवरुन संपर्क करित होता.

या कामगिरीत दलाचे अधिकारी सुनिल गिलबिले, समीर शेख, चालक राजु शेलार, नवनाथ मांढरे तसेच जवान राजाराम केदारी,

Advertisement

प्रकाश शेलार, छगन मोरे, मंगेश मिळवणे, योगेश चोरघे, सुनिल टेंगळे, हेमंत सातभाई यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मिळाली.

हेपण वाचा : रविवार पेठेत जुना वाडा कोसळला

3 thoughts on “नाल्यात बुडालेल्या युवकास अग्निशमन दलाकडून जीवदान (Fire brigade jawan)

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल