ताज्या घडामोडी

पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

Advertisement

Pervez Musharraf : पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

Pakistan President Pervez Musharraf has been sentenced to death

Pervez Musharraf : सजग नागरिक टाइम्स :पाकिस्तानातील विशेष कोर्टाने पूर्व लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे.

न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठाने 2-1 ने निर्णय देताना परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधातील राष्ट्रद्रोहाचा हा खटला 2013 पासून रखडलेला होता.परवेझ मुशर्रफ हे सध्या दुबईत आहेत .

2016 मध्ये ते पाकिस्तानातून औषधोपचारासाठी दुबईला गेले. त्यामुळे ही सुनावणी रखडली होती.

पाकिस्तानात पुन्हा परतण्याच्या अटीवर परवेझ मुशर्रफ हे उपचाराचं कारण देऊन पाकिस्तानातून दुबईला गेले होते.

मात्र तेव्हापासून ते पाकिस्तानात आलेच नाहीत . त्यामुळे पाकिस्तानातील न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते.

आज कोर्टाने परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

दरम्यान, पाकिस्तानाच्या इतिहासात मुशर्रफ हे पहिले नागरिक होते , ज्यांच्याविरोधात संविधानाच्या अवहेलनेचा खटला चालला.

परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात 31 मार्च 2014 रोजी आरोप ठेवले गेले होते.

अधिक माहिती  

परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानाचे राष्ट्रपती असताना त्यांनी पाकिस्तानात 3 नोव्हेंबर 2007 रोजी आणीबाणी लागू केली होती.

Advertisement

पाकिस्तानात 2013 मधील निवडणुकीत विजय मिळवून पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज़) सरकार सत्तेमध्ये आले.

पाकिस्तानात सत्तेत आल्यानंतर (नवाज़) सरकारने सर्वात आधी मुशर्रफ यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला.

याप्रकरणी डिसेंबर 2013 मध्ये मुशर्रफ विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला.

इतर बातमी : संविधानाच्या रक्षणासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा उभा करणार- आयपीएस अब्दुररहमान

इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना 31 मार्च 2014 रोजी देशद्रोहाच्या खटल्यात आरोपी केले होते.

पाकिस्तानाच्या इतिहासात मुशर्रफ हे पहिले नागरिक होते, ज्यांच्याविरोधात संविधानाच्या अवहेलनेचा खटला चालला.

परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात 31 मार्च 2014 रोजी आरोप ठेवले गेले होते,

व त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्याविरोधात सर्व पुरावे विशेष न्यायालयासमोर ठेवण्यात आले होते.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान परवेझ मुशर्रफ दुबईला गेले ते परत आलेच नाहीत,त्यामुळे कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं.

या खटल्यातील सुनावणीदरम्यान मुशर्रफ हे केवळ एकदाच विशेष न्यायालयात हजर राहिले.

त्यानंतर ते कधीही कोर्टात आलेच नाहीत. त्याचदरम्यान 2016 मध्ये प्रकृतीचं कारण देत, मुशर्रफ दुबईला गेले.

त्यावेळी त्यांना पाकिस्तानात परतण्याच्या अटीवर देश सोडण्याची परवानगी दिली होती.

आंदोलना विषयीचे इतर video पहा

Share Now

One thought on “पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

Comments are closed.