Pimpri Chinchwad : माहिती अधिकारात नागरिकांना योग्य माहिती न देण्याबरोबरच आयुक्तांनाही तब्बल एकोणीस दिवसांनी खुलासा देत,

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणा-या उद्यान अधीक्षक आणि मुख्य कारकुनाला Pimpri Chinchwad आयुक्तांनी सक्त ताकीद दिली आहे.
प्रकाश मोगल गायकवाड असे उद्यान अधीक्षकाचे तर लक्ष्मण तुकाराम डगळे असे मुख्य लिपिकाचे नाव आहे.
गायकवाड हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागात उद्यान अधीक्षक तथा वृक्षसंवर्धन विभागाचे जन माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
नितीन शशिकांत यादव यांनी अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीमार्फत उद्यान विभागाशी संबंधित माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती.
ही माहिती मुदतीत न देता उलट त्यांनाच माहितीसाठी एक लाख रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले.माहिती न मिळाल्याने यादव यांनी अपील केले हेते.
त्यांनी केलेले अपील निकाली न काढणे, अपील सुनावणीला गैरहजर राहणे, अर्जदाराला भयभीत करणे, धमक्या देणे, नागरिकांशी गैरवर्तन करणे इत्यादी बाबी त्यांच्या सोबत घडल्या.
त्यावर नितीन यादव यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असता त्यांनी शीघ्रतेने अहवाल सादर करण्याचे आदेश गायकवाड यांना दिले होते.
मात्र, या आदेशालाच केराची टोपली दाखवित गायकवाड यांनी अहवाल सादर करण्यास तब्बल एकोणीस दिवस उशीर लावला होता .
\त्यामुळे गायकवाड आणि मुख्य कारकून डगळे यांची शासकीय सेवक म्हणून कर्तव्यपरायणता संशयास्पद असल्याचे ,व कार्य हलगर्जीपणाचे आणि अशोभनिय आहे,
असा आरोप ठेवत या दोघांनाही सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यापुढे कार्यालयीन कर्तव्यपालनात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे