(Police alert) सावधगिरी का मुस्कटदाबी ?
अधिका-यांना नागरिक भेटायला गेले तर मोबाईल फोन केबिनच्या बाहेर ठेवण्यास लावत असल्याचा प्रकार आला समोर.
मोबाईल मधील डाटा किंवा फोनच चोरी गेल्यास जबाबदार कोण ?
(Police alert) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :
काही दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्तांचा फुकट बिर्याणीचा प्रकार समोर आल्याने महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला होता.
तर सोशल मिडियावर नेटक-यांनी रान पेटवले होते.
बिर्याणीची चर्चा सुद्ध्या कमी झाली असली तरी आता पोलिसांनी ब-याच पैकी सावधगिरी बाळगली आहे.
वाचा : DCP मॅडमला बिर्याणी खायचीय तेही फुकटात ? गृहमंत्र्यांनी दिले चौकशी चे आदेश
फोनवर बोलताना जरा जपूनच बोलावे असे कानमंत्र अनेक गुरूकडून मिळतच असतात.
परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले तर त्याची किंमत मोजावी लागते हे काही सांगायची गरज नाही.
पुणे पोलिसांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन केबिनच्या बाहेर ठेवण्यास लावत असल्याचा प्रकार पुणे पोलिस आयुक्तलयात घडत आहे.
पोलीस उपायुक्तांना (DCP) भेटण्यासाठी गेलेल्या नागरिकांना केबिनच्या बाहेर मोबाईल फोन ठेवण्यास भाग पाडले जात असल्याचे निदर्शनात आले .
पोलीस आयुक्तालयातील उपायुक्तांना (DCP) भेट घेण्यासाठी काही जण थांबले होते.
त्यांना उपायुक्तांनी आत बोलावल्यावर केबिन बाहेर असलेल्या महिला कर्मचारी नागरिकांच्या हातातून मोबाईल घेत समोरील टेबलावर ठेवत असल्याचे दिसून आले .
हा काय प्रकार आहेत असे विचारल्यावर उपायुक्तांनीच सांगितल्याचे सांगण्यात आले.
जर उपायुक्तांना भेटण्यासाठी एका वेळी अनेक लोकं गेली व सर्वांचे फोन जमा करण्यात आले ,
व नागरिकांनी जाताना फोन मागितला तर कसे ओळखणार कि त्यांचा फोन कोणता व इतरांचा फोन कोणता ?
जर त्या मोबाईल मधील डाटा अथवा मोबाईलच चोरी गेला तर याची जबाबदारी कोणाची ?
मोबाईल बाहेर ठेवला व तो कधी तो कर्मचाऱ्यांच्या हातातून पडला तर याची भरपाई देण्याची जबाबदारी कोणाची ?
नागरिकांकडील मोबाईल फोन केबिनच्या बाहेर ठेवायला लावण्या संदर्भात पोलीस आयुक्तांनी असे आदेश दिले आहे का ?
जर आदेश दिले असेल तर त्याची गरज का भासली ?
नागरिकांना मोबाईल फोन बाहेर ठेवायला लावणे म्हणजे पोलीसांनी घेतलेली दक्षता आहे का मुस्कटदाबी ?
असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलीस उपायुक्तांच्या अश्या वागण्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.