ताज्या घडामोडी

रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विकणा-यांवर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई.

Advertisement

(Ration grain chor) सदरील आरोपींकडून एक लाख चार हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

(Ration grain chor) सजग नागरिक टाइम्स :

सरकारी रेशन दुकानातील माल चढ्या दराने काळ्या बाजारात विकणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे .

त्यांच्यासह दोन रेशन दुकानदारांवर जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

रितीक चंदन गुप्ता ( वय १८ दोन्ही रा . रहाटणी , काळेवाडी , वाकड , पुणे )

चंदन द्वारका गुप्ता ( वय ३८ ) ,शंकर आयोध्या गुप्ता ( वय २२ , रा . साईनगर , कॉलनी क्रमांक चार , नखाते वस्ती , रहाटणी , पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

police-arrested-ration-grain-chor

तर रेशन दुकानदार जांभळे ( पूर्ण नाव माहित नाही , वय ३० , रा . आनंदनगर , झोपडपट्टी , चिंचवड , पुणे )

थोरात ( पुर्ण नाव माहित नाही , वय ४० , रा आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड , पुणे ) ,

यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

वाचा : बदली ऑर्डर निघून हि १० महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्यांवर कारवाई होणार का ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रविवारी ( दि .२७जून रोजी )

Advertisement

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना माहिती मिळाली की ,

काळेवाडी येथून सरकारी रेशन दुकानातील माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केला जात आहे .

त्यानुसार पोलिसांनी पवारनगर गार्डनच्या बाजूला काळेवाडी येथे सापळा लावून छापा टाकला .

त्यात दोन दुचाकी ( एमएच १४ / जी एल १५४७ आणि एमएच १४/ ई एल ६५३८) वाहने पोलिसांनी जप्त केली .

तसेच तिघांना ताब्यात घेतले.

तिघांकडून ३७ हजार ४०० रुपये किमतीचे ३४ गव्हाचे पोते , ६७ हजारांच्या दोन दुचाकी ,

असा एकूण एक लाख चार हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . (Ration grain chor)

रेशन दुकानदार जांभळे आणि थोरात यांनी अटक केलेल्या तीन आरोपींना रेशन दुकानात वितरित होणारा गहू पुरवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत .

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे ,

पोलीस अंमलदार संतोष बर्गे ,धैर्यशिल सोळंके , नितीन लोंढे , सुनिल शिरसाट ,

राजेश कोकाटे सोनाली माने भगवंता मुळे , अनिल महाजन ,संगिता जाधव , मारुती करचुंडे , गणेश कारोटे यांनी केली .

वाचा : मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडिओ वायरल करणा-या नराधमास अटक

Share Now