सजग नागरिक टाइम्स, (Police News) पुणे खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेला आरोपी सागर दत्ता चांदणे (वय 19 रा महादेव वाडी खडकी, पुणे)
हा दाखल गुन्ह्याच्या न्यायालयीन प्रक्रिया कामी न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरोधात नाॅन बेलेबल वाॅरंट काढले.
त्या नंतर आरोपी खडकी पोलीस स्टेशन कडील पोलीसांना 14 जाने रोजी मिळून आल्याने त्यास सदर वाॅरंटमध्ये अटक करून न्यायालयात हजर केले,
असता त्यास न्यायालयाने जेल ऑडर काढल्याने त्याला येरवडा कारागृहात नेण्यास येत असताना खडकी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळाला.
त्या बाबतीत येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला व त्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार खडक पोलीस स्टेशन कडील कर्मचारी रवी लोखंडे यांच्या बातमीदारामार्फत नमूद आरोपी हा काशेवाडी पुणे येथे मित्रास भेटायला येणार आहे ,
अशी बातमी मिळाली असल्याने खडक पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काशेवाडी पुणे येथे साध्या वेशात सापळा रचून अवघ्या 5 तासांत ताब्यात घेतले,
व आरोपीस येरवडा पोलीस स्टेशन कडील पोलीसांकडे देण्यात आले आहे सदरील आरोपी विरोधात खुन, जबरी चोरी, दरोडा असे गुन्हे दाखल आहेत.
सहा. पोलीस आयुक्त प्रदिप आफळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय कुमार शिंदे, सहाय्य पोलीस निरीक्षक वैभव पवार,
कर्मचारी विठ्ठल पाटील, संदिप पाटिल, रवी लोखंडे, आशिष चव्हाण, इम्रान नदाफ,
विनोद जाधव, विशाल जाधव, सागर केकाण, समीर माळवदकर, प्रमोद नेवसे यांनी सदरील कामगिरी केली आहे