ताज्या घडामोडीपुणे

व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा

Advertisement

video games व lottery center वर पोलिसांचा छापा

Police raids on video games and lottery centers

सजग नागरिक टाइम्स :स्वस्तिक ऑनलाईन lottery center व video games द्वारे लॉटरी खेळायला लावून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

सदरील घटना २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिवगंगा कॉम्प्लेक्स, सोमजी बस स्टॉप कोंढवा येथे घडली आहे.

यात संदीप कहर (वय ३१, रा. धनकवडी), लखन पंडोरे (वय २३, रा. सह्याद्रीनगर), विजयकुमार जोडतले (वय २८, रा. कात्रज), दत्तात्रय घुले (वय ३०, रा वडगाव-बुद्रुक),

गोविंद देशपांडे (वय ३१, रा. कोंढवा), नंदलाल कहार (वय ३१, रा. धनकवडी) यांना अटक करण्यात आली असून,

जुगार खेळणारे ८ जणही सहभागी आहेत. दुकानाच्या मालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्तिक ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या मालकाकडे ऑनलाईन लॉटरी चालवण्याचा परवाना नसताना,

मालक व कामगार यांनी संगनमत करून लॉटरी सेंटरमध्ये मशिन ठेवून लोकांना लॉटरी खेळायला लावून शासनाचे महसूल न देता फसवणूक केली आहे.

यात ६५ हजार रुपयांचे १३ व्हिडिओ गेम, ७ हजार रुपयांची सॅमसंगची स्क्रिन व त्यापाठीमागील सीपीयू,

३१,८९०/- रोख रक्कम असा एकूण १,०४,३९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास कोंढवा पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुंभार करीत आहेत.

Advertisement

रिलेटेड बातमी :पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला मार्केटयार्ड पोलिसांनी केली अटक

पुणे: मागील 3 वर्षापासून घरामध्ये कोणी नसताना किंवा झोपल्यानंतर नराधम बाप हे दुष्कृत्य करत होता.

या घटने प्रकरणी एका 42 वर्षीय महिलेने (Market yard police station) मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आरोपीच्या विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराच्या विषयासंदर्भात माहिती देत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या समुपदेशक असून ते अनेक शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात जनजागृती करून माहिती देण्याचे काम करीत असतात.

दरम्यान अशाच प्रकारचे समुपदेशन त्या एका शाळेत करत असताना एक 13 वर्षाची मुलगी रडत होती.

तेव्हा फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

3 वर्षापासून तिचे वडील आपल्यावर अत्याचार करत असल्याचे मुलीने फिर्यादी यांना सांगितले.

त्यानुसार पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेपण वाचा : मार्केट यार्ड आंबेडकर नगर येथे अवैधरित्या चालतोय दारूचा धंदा

Share Now

One thought on “व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा

Comments are closed.