ताज्या घडामोडीपुणे

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाचा पुढाकार

Advertisement

Popular Front of India : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाचा पुढाकार

Popular Front of India : सजग नागरिक टाइम्स : देशात व पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्यामुळे मृत्यु होणा-यांच्या संख्येतही सातत्याने भर पडत आहे.

कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे कोरोना संक्रमणामुळे व्यक्ति मृत झाल्यास त्याच्या अंत्यविधी/

दफनविधी साठी त्याचे कुटूंबिय कॉरन्टाईन असल्यामुळे उपलब्ध होऊ शकत नाहीत अथवा भीतीमुळे समोर येत नाहीत.

अशात मृत व्यक्तिच्या अंत्यविधीसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने पुढाकार घेतला असून आतापर्यंत 20 मृतांच्या दफनविधी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मृत व्यक्तिंच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

मध्यंतरी करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या अंत्यविधीचा मोठा प्रश्न पुणे महानगपालिकेसमोर उपस्थित झाला होता.

VIDEO : Coronaमुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी Popular Front of Indiaचा पुढाकार

यामुळे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्वंयसेवी संस्थांनी याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते.

Advertisement

त्यानुसार  पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया ने पुढाकार घेत कोरोना संक्रमणाने मृत झालेल्या व्यक्तिंच्या अंत्यविधीसाठी सर्वतोपरि मदत करण्याचे पत्र महापालिकेला दिले होते .

यास पुणे मनपाने होकार देऊन संघटनेच्या 50 कार्यकर्त्यांना सर्व वैद्यकिय नियमांचे तंतोतंत पालन करण्याबाबत ट्रेनिंग दीली.

तसेच त्यांना पीपीई कीट व इतर आवश्यक सामुग्री पुरविण्यात आले.

mk-digital-seva
https://mkdigitalseva.com/

जेथे कोरोना संक्रमित रुग्णांना वैद्यकिय सेवा पुरविली जात आहे तेथे पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेचे व इतर संघटनेचे संपर्क नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अत्यंत कठिण समयी व शोकाकूल वातावरणात मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांच्या मदतीला संघटना धावून जात असल्यामुळे पॉप्यूलर फ्रंट टिमचे व रजी खानचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मदत नव्हे कर्तव्य म्हणून ३५० राशनकिट वाटप करून अझरुद्दीन सय्यद यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Share Now

One thought on “कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाचा पुढाकार

Comments are closed.