News Updatesमहाराष्ट्र

समाज माध्यमातील अफवेने गरोदर मातांच्या चिंतेत वाढ

Advertisement

Pregnant women news : कोरोनाचा धोका हे गरोदर माता आणि त्यांच्या बाळांना अधिक असतो या अफवेने सध्या अनेक गरोदर माता त्रस्त आहेत.

pregnant women news in solapur
pregnant women news in solapur

Pregnant women news : सोलापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाने कोणालाही होऊ शकतो हे जरी खरे असले तरी कोरोनाचा धोका हे गरोदर माता आणि त्यांच्या बाळांना अधिक असतो या अफवेने सध्या अनेक गरोदर माता त्रस्त आहेत.

या अफवेमध्ये कितपत सत्य आहे हे अद्यापही कळायला मार्ग नसल्याने समाज माध्यमातून पसरणाऱ्या विविध अफवांवर विश्वास ठेवून गरोदर मातांची मानसिकता अधिकच बेचैन होत असल्याचे सध्या निदर्शनास आलेला आहे.

आपण कोरोनाचे शिकार झालो तर पोटात वाढणाऱ्या बाळाला सुद्धा कोरोना होईल का आणि झालाच तर जन्मानंतर बाळाला अनेक वर्षे सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागेल का?

आपल्या बाळाला आपल्याशिवाय कोणीही  कवेत घेणार नाही का ? अशा अनेकविध चिंतेने गरोदर मातांची मानसिक स्थिती सध्या खालावत असल्याचं दिसून आलेला आहे.

राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी मुज्जम्मील शेख यांची निवड

शिवाय तपासणीसाठी हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर पोटातील बाळाच्या तपासणीआधी कोरोना चाचणीस सामोरे जावे लागेल का ?

Advertisement

आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मधल्या विसंगतीमुळे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाला विनाकारण होम कवारंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जाईल का ?

अशा अनेक चिंता गरोदर मातांच्या मनात घर करत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी टाळेबंदी.. आर्थिक अडचण.. हॉस्पिटलचा खर्च.. तपासणी अहवालाची चिंता..

गरोदरपणातील अनेक अडचणी अशा अनेक समस्या असताना कोरोना चाचणी ही आणखी एक भयानक समस्या गरोदर मातांसमोर सध्या ‘आ’ वासून उभा असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

Online e pass काढुन देणा-या भांमट्यावर पोलीसांची कारवाई

सध्या सोलापूर शहरांमध्ये गरोदर मातांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे शिवाय त्यांना डबलसीट घेऊन कुणी हॉस्पिटलला जात असेल तर त्यांना पोलिस अत्यंत त्रासदायक वागणूक देत आहेत हे अनेक घटनांवरून दिसून आलेला आहे.

गरोदर मातांना काही त्रास होत असेल तर त्यांना तातडीने दुचाकीने, चारचाकीने हॉस्पिटलला नेणे गरजेचे असते आणि अशावेळी रस्त्यातच पोलिसांचा त्रास सुरू झाला तर गरोदर महिलेच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो

आणि म्हणून पोलिसांनी फक्त त्यांचं कर्तव्य बजावावे ना की कोणत्याही अडचणीत असलेल्या किंवा गरोदर असलेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये.. वेठीस धरू नये अशी अपेक्षा समस्त महिलावर्गांकडून होत आहे.

Share Now