Homeताज्या घडामोडी'इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात ' पुस्तकाचे प्रकाशन

‘इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात ‘ पुस्तकाचे प्रकाशन

इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात ‘  पुस्तकाचे प्रकाशन,विवेकवादी तत्वज्ञानाची आहे गरज ! : डॉ. गणेश देवी (publishing a book)

publishing a book Islam Known and Unknown marathi language

Publishing a book : पुणे :’डॉ.अब्दुल कादर मुकादम यांचे ‘इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात ‘

हे पुस्तक मराठी (marathi)भाषेत इस्लामी तत्वज्ञानाची मांडणी करणारे महत्वपूर्ण पुस्तक आहे,

संवेदनशील विषयावर त्यांनी केलेली मांडणी वस्तुनिष्ठ आणि विवेकवादी परंपरा पुढे नेणारी आहे .

 पुरोगामी संघटनांनी, इस्लामविषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने  हे पुस्तक(book) मुळातून वाचले पाहिजे,

‘असे उद्गार  राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ.गणेश देवी यांनी काढले.

हेपण वाचा : २६वर्ष जुना अडीच किलो ट्यूमर (Tumor)१७ तासांच्या शस्त्रक्रि येनंतर काढला

(Islam Known and Unknown‘) ‘इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात ‘ या डॉ. मुकादम लिखित पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. देवी,प्रमोद मुजुमदार, अन्वर राजन ,कलिम अजीम यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी डॉ. देवी बोलत होते. याच कार्यक्रमात डॉ. मुकादम यांचा सत्कार करण्यात आला.

देवी पुढे म्हणाले, ‘भाषा आणि तत्त्वज्ञानाची सांगड या  पुस्तकात घालण्यात आलेली आहे.

राष्ट्र सेवा दलात  मुकादम यांची जडणघडण झाल्याने सेवा दलाचे संस्कार त्यांच्या लिखाणात दिसून येतात.

हेपण वाचा : मस्जिद बाहेर भीक मागणा-या 40 भिका-यांची रवानगी येरवडा सुधारगृहात

मी या पुस्तकाचा कानडी अनुवाद करण्यासाठी प्रयत्न करेन आणि लवकरच ते कानडी वाचकांनाही उपलब्ध करून देण्यात येईल ‘

यावेळी बोलताना डॉक्टर मुकादम म्हणाले, ‘मागील पंधरा वर्षांपासून इस्लाम फोबिया सुरू आहे .

मी इस्लाम तत्वज्ञानाची मांडणी आणि अभ्यास 40 वर्षांपासून करीत आलो आहे.

त्यासाठी मी पाश्चात्य संदर्भ वापरले आहेत. इस्लाम बद्दल मराठीत वाचायला  मिळणारे लेखन  शंकास्पद आहे. ‘

‘पुरोगामी संघटनांच्या सहवासातून माझी वैचारिक जडणघडण झाली इस्लाम कडे पाहण्याचा दृष्टिकोण निर्माण झाला’,असेही त्यांनी सांगितले .

हेपण वाचा : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र मालक संपादक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय फडतारे

साने गुरुजी स्मारक ( राष्ट्रसेवा दल ) येथे नुकताच (29  july ) हा प्रकाशन समारंभ झाला.

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद मुजुमदार यांनी डॉ. मुकादम यांची प्रकट मुलाखत घेतली.

सर्फराज अहमद यांनी सूत्रसंचालन केले .’दि मुस्लिम अकादमी’ ,’

दक्षिणायन ‘आणि ‘ सलोखा’ या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले .

यावेळी अन्वर राजन ,कलिम अजीम, मिनार सय्यद, अन्वर शेख,शमसुद्दीन तांबोळी ,

प्रवीण सप्तर्षी, हयात मोहम्मद पठाण आदी मान्यवर उपस्थित असल्याची माहिती मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular