पुणेब्रेकिंग न्यूज

फरार व तडीपार असलेला सराईत गुंड जेरबंद

Advertisement

Police Arrested gangster : युनिट – ३ गुन्हे शाखा पुणे ची कामगिरी

pune-crime-branch-police-arrested-gangster

सजग नागरिक टाइम्स : (Police Arrested gangster) :पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् व रविन्द्र शिसवे पोलीस सह आयुक्त पुणे

यांच्या आदेशाने युनिट – ३ गुन्हे शाखा पुणे ची कामगिरी जोमात।

गुन्हे शाखा युनिट-३ पुणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस अभिलेखा वरील गुंड,

फरारी, पाहीजे व तडीपार असलेल्या गुन्हेगारांची माहीती काढुन त्यांचा शोध घेत असताना

दिनांक-०७/०९/२०१९ रोजी पोलीसांना खब-याकडुन मिळालेल्या माहीतीवरुन (kothrud police station)

कोथरुड पोलीस स्टेशन पुणे यांनी पुणे शहर व जिल्हयामधुन दोन वर्षाकरिता तडीपार केलेला गुंड

नितीन रामदास सणस वय – २८ रा – चाळ नं ४ सर्वे नं ११२ सुतारदरा कोथरुड पुणे यास आठवले चौक(law college road) लॉ कॉलेज रोड एरंडवणे पुणे येथे पकडण्यात आलेले आहे.

दोन तडीपारा सहीत तीन गुंड घातक हत्यारा सहित जेरबंद

Deputy Commissioner of Police परिमंडळ – ३ पुणे शहर यांनी त्यास दिनांक २७/११/२०१८ पासुन दोन वर्षासाठी पुणे शहर व जिल्हयातुन तडीपार केलेले आहे.

दिनांक-०८/०७/२०१९ रोजी रात्रौ ०९/०० वा चे सुमारास आठवले चौक एरंडवणा पुणे याठिकाणी आरोपी नितीन सणस व त्याचे इतर साथीदार ऋतिक एखंडे,

समीर सुपेकर, विशाल सणस, विठठल राजपुत, आनंद शिंदे व इतर यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन जयदिप अक्षय जोरी वय – २३ रा – भालेकर चाळ एरंडवणा पुणे

Advertisement

यांचेवर कोयत्याने वार करुन तसेच हाताने व लाथाबुक्यानी मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे.

त्याबाबत डेक्कन पोलीस स्टेशन पुणे  भा दं वि कलम ३२६, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट कलम ४ सह २५ मपोों कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे

गुन्हा दाखल आहे त्या गुन्हयामध्ये आरोपी फरार होता. त्याचेविरुध्द यापुर्वी कोथरुड पोलीस स्टेशन पुणे येथे खुनाचा एक,

खुनाचा प्रयत्नाचे दोन, गंभीर दुखापतीचे चार, दंगा मारामारीचा एक, खंडणीचा एक,अग्निशस्त्र जवळ बाळगल्याचा एक

असे एकुण दहा (Deccan Police Station) डेक्कन पोलीस स्टेशन येथे गंभीर दुखापतीचा एक असे एकुण अकरा गुन्हे दाखल आहे.

pune-crime-branch-police-arrested-gangster
हेपण वाचा :सदरिल मृत महीलेचे शव(Death Body) अंत्यविधीसाठी नातेवाईकांनी घेऊन जाण्याचे पोलिसांचे अव्हान

सदर कामगिरी गुन्हे शाखा, पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, (dcp)पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर बच्चन सिंग,

(acp)सहायक पोलीस आयुक्त गुन्हे पुणे डॉ. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे (PI) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,

(psi)पोलीस उप निरीक्षक किरण अडागळे, संजय गायकवाड, व (Crime Unit 3)गुन्हे युनिट – ३ पथकातील पोलीस कर्मचारी अनिल शिंदे,

रामदास गोणते, अतुल साठे, संदिप राठोड, राहुल घाडगे, दत्तात्रय गरुड, मचिंन्द्र वाळके,गजानन गानबोटे,

कल्पेश बनसोडे यांनी केली असल्याची माहिती मिळाली.

Share Now

One thought on “फरार व तडीपार असलेला सराईत गुंड जेरबंद

Comments are closed.