वर्षाला 1750 रुपये tax भरणा-या इनामदाराला आता भरावे लागणार लाखो रुपये

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

4शाळेतील जागेचे वर्षाला 1750 रुपये Tax भरणा-या इनामदाराला आता भरावे लागणार लाखो रुपये

pune-hadpsar-sayyad-nagar-inamdar-school-property-tax-issue

सजग नागरिक टाइम्स:पुणे:हडपसर सय्यदनगर येथील आयडीयल एजूकेशन ट्रस्ट चालवत असलेल्या समता प्राथमिक विद्यामंदिर, यासिन इनामदार माध्यमिक विद्यालय, अलजदिद उर्दू हायस्कूल, लेडि रहमतबी इनामदार ऊर्दू प्रायमरी स्कूल या 4 शाळेच्या जागेचा Tax फक्त 1750 रुपये भरला जात होता व तो ही निवासी व सदरील जागेत ४ ते ५ मजले इमारत बांधण्यात आली असूनही पुणे मनपाची दिशाभूल करून कर चुकविण्यात येत होता,

परंतु सजग नागरिक टाइम्सचे संपादक मजहर खान यांनी शाळेच्या व इनामदाराच्या मालमत्तेची चौकशी व्हावी व tax चोरीला आळा बसावा म्हणून सतत पाठपुरावा केल्याने व बातम्या दिल्याने पुणे मनपाचे उपायुक्त विलास कानडे यांनी सदरील जागेची मोजणी करून योग्य तो Tax लावण्याचे सबंधित अधिका–यांना आदेश दिले होते.

Advertisement

सबंधित अधिकारी वर्ग जेव्हा जागा मोजणीसाठी तेथे गेले तेव्हा इनामदाराने राजकीय व अनेक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला

पण पुणे मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्याच्या दबावाला भीक घातली नाही व त्याच्या वतनदारीला सरकारी हिसका दाखवला व मोजणी करून नवीन दराने व पूर्ण बांधकामाचा tax लावण्यात आला.

Advertisement
pune hadpsar inamdar school property pmc tax issue

सदरील वतनी जागा हि इनामदाराने त्याची पत्नी शकीला शफी सय्यदच्या नावाने नोंदवली असून 31मे 2019 पर्यंत 16 लाख 65,114 रुपये भरावयाचे आहे जर वेळेवर पैसे भरले नाही तर प्रती माह 2 टक्के दंडासहीत रक्कम भरावी लागणार आहे,

सदरील इनामदाराच्या इतरही मालमत्तेची चौकशी सुरू असून त्यापासूनही वर्षाला लाखो रुपये Tax पुणे मनपाला मिळणार आहे.

4 thoughts on “वर्षाला 1750 रुपये tax भरणा-या इनामदाराला आता भरावे लागणार लाखो रुपये

Leave a Reply