Homeब्रेकिंग न्यूजपुणे: पेशवे कालीन मंदिर तोडल्याने कोर्टाचे चौकशीचे आदेश

पुणे: पेशवे कालीन मंदिर तोडल्याने कोर्टाचे चौकशीचे आदेश


  सजग नागरीक टाईम्स :पुणे शहर सर्वे नं 391/392 नवा मंगळवार पेठ बोलाईखाना येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए)  राबवली जात असुन सदरील जागेवर पेशवे कालीन शिवमंदिर होते सदरील एसआरए योजनेला मंदिर हे अडथळा होत असल्याने सदरील पेशवे कालीन शिवमंदिर पाडण्यात आले होते .मंदिर तोडताना कोणत्या प्रकारचे शासकीय पत्रव्यवहार झाले आहे की नाही  समाजिक कार्यकर्ते जाॅनसन वसंत कोल्हापुरे रा मंगळवार पेठ यांनी माहिती घेण्यास सुरूवात केली असता अधिकारी यांनी टोलवाटोलवी करून वेळ मारून नेली . अमाझोन ऑफरच्या माहितीसाठी लिंकवर क्लिक करा
सदरील तक्राराची फिर्याद कोल्हापुरे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात देण्यासाठी गेले असता तेथेही फिर्याद दाखल करून न घेता हाकलुन लावण्यात आल्याचे  कोल्हापुरे यांनी आरोप केले.या प्रकरणी जाॅनसन वसंत कोल्हापुरे यांनी अॅड वाजेद खान बिडकर यांच्या मार्फत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार करून याचिका दाखल केली. त्याची दखल घेत प्रथम न्यायदंडाधिकारी एम ए देशमुख यांनी एसआरए मधील तहसीलदार गीता गायकवाड, अर्जुन जाधव,व डेवलपरस ची पोलीस चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular