कोंढवा ; पारगे नगर मधिल अवैध बांधकावर पुणे मनपाचा हतोडा,

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

(illegal construction Pargenagar kondhwa)जॅक कटरच्या सहाय्याने पाडले बांधकाम. विकासकावर या पूर्वी MRTP 52 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .तरी सुद्धा काम चालू होते .

पारगेनगरमध्ये तर कारवाई झाली पण भाग्योदयनगर,मिठानगर,नवाजिशपार्क,साईबाबानगर येथील बाधकामावर कारवाई कधी होणार?

(illegal construction Pargenagar kondhwa) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :

कोंढवा येथील अवैध बांधकामावर पुणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे.

पालिकेने कारवाई केल्याने अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सर्वे नंबर ३८ पोकळे मळा कोंढवा खुर्द पारगे नगर येथे पुणे महानगरपालिका कडून कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
video paha

पोकळे मळा येथिल राहिवाश्यांन तर्फे पुणे मनपा ला तक्रारी कण्यात आले होते.

या अगोदरही सदरील बांधकामावर कारवाई करण्यात आली होती,

परंतु पुन्हा काम चालू झाल्याने नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

Advertisement

अखेर पुणे महानगर पालिकेने अवैध इमारतीवर हातोडा चालवला आहे.

Advertisement

सदरील कारवाई सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती.

कोंढवा पोलिस ठाण्याच्या मदतीने कडक बंदोबस्त घेऊन जॅक कटर मशीन वापरून

५ मजली इमारतीवर वर कारवाई करून सुमारे ८००० चौ. फूट बांधकाम क्षेत्र निष्कासित करणेत आले.

ही कारवाई कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे व उपअभियंता कैलाश काराळे,

Advertisement

इमारत निरीक्षक धनंजय खोले, यांनी इतर सहकारी व पोलिस उप निरीक्षक मचाले यांच्या सोबत पार पाडली.

कोंढवा परिसरातील अनधिकृत बांधकामाचे प्रमाण वाढत असल्याने ही कारवाई अशीच चालू राहणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले आहे.

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल