ताज्या घडामोडीपुणे

घरमालक स्वतः राहत असलेल्या मिळकतींना मिळणार दिलासा

Advertisement

पुणे : घरमालक स्वतः राहात असलेल्या मिळकतींना मिळकत करात दिलासा मिळण्याची शक्यता. २०१९ पूर्वीची मिळकत करातील ४० टक्के सवलतीची मागणी चालू बिलात झाली असल्यास कागदपत्रांची तपासणी करून व ही सवलत कायम ठेवली जाणार आहे .

मिळकत करात दिली जाणारी ४० टक्के सवलत रद्द करून तिची मागणी २०१ ९ पूर्वीच्या मिळकत कर बिलात करण्यात आली असेल तर , संबंधित मिळकतधारकाने महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे अर्ज करावे . त्यांच्या अर्जाची तपासणी करून बिलात दुरुस्ती केली जाणार आहे . मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी ही माहिती दिली . महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याने मे २०१९मध्ये काढलेल्या आदेशात वाजवी भाडे ६० टक्के धरून करपात्र मूल्याच्या ४० टक्के दिलेल्या सवलतीच्या अनुषंगाने वसूल करावयाची फरकाची रक्कम १ ऑगस्ट २०१९पासून पुढे वसूल करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.

घेण्यासाठी यानुषंगाने महापालिकेने शहरातील मिळकतींचा शोध जीएसआय मॅपिंग , मिळकतधारकाचा फोन नंबर , ईमेल आयडी , प्रत्येक मिळकतीचा जुना मिळकत कर क्रमांक आणि जीएसआय मिळकत क्रमांक यांचा समावेश करुन क्युआर कोड तयार करणे. याकरिताचे काम सारा आयटी रिसोर्सेस प्रा . लि . आणि सायबर टेक सिस्टीम अॅण्ड सॉफ्टवेअर या दोन कंपन्यांना २०१६ मध्ये दिले होते .

Advertisement

या कंपन्यांकडून सर्वेक्षण करताना जीएसआय प्रणालीमध्ये केवळ १० ते १५ टक्के पडताळणी झाली . तर ही पडताळणी करताना मिळकत कराची ४० टक्के सवलत काढून टाकल्याची प्रकरणे जास्त नोंदविण्यात आली .

यामध्ये जेथे घरमालक स्वतः राहात आहे , अशा मिळकतीही माहिती नसल्याने तेथे भाडेकरू राहात आहे , असे दाखविण्यात आले .

या माहितीच्या आधारे शहरातील एकूण मिळकतींमध्ये म्हणजेच स्वतः घरमालक घरात राहात असलेल्यांची ४० टक्के सवलत काढून घेण्याचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे मिळकतकर विभागाच्याच निदर्शनास आले .

दरम्यान , याबाबत अनेक मिळकतधारकांनीही महापालिकेकडे तक्रार केली .

अखेरीस महापालिकेच्या मिळकतकर विभागाने ज्यांची ४० टक्के सवलत १ ऑगस्ट २०१९ पूर्वी बंद झाली व त्यांच्याकडून पूर्ण १०० टक्के मिळकतकर वसूल केला गेला आहे , अशा नागरिकांनी तक्रार केल्यास योग्य तो निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share Now