ताज्या घडामोडी

कोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,

Advertisement

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :

कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

तर पुणे महानगर पालिकेत ज्यांना जनतेने निवडून सत्तेत पाठविले ते आज विरोधकांसोबत महापौरांच्या बंगल्यावर पार्टी करत असल्याचे समोर आल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

सदरील पार्टीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर
सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,

Advertisement

विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ,काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार,

मनसेचे वसंत मोरे यांच्यासह आणखीन काही नगरसेवकही उपस्थित असल्याचे वृत पुण्यातील एका दैनिकाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाले.

दिवसात पालिकेत एकमेकांवर आरोप प्रति आरोप करत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार देखील करतात. आणि एकत्र येत पार्टी करतात.

म्हणजे आपून मिलकर पार्टी मनाई और पुणेकर को येडा बनाई? असे प्रकार घडत आहे.

पार्टीचे कारण गुलदस्त्यात असले तरी सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा आहे.

Share Now