दोन तास रांगेत उभं राहून Raj Thackerayनी केल मतदान
मुंबईमधिल बालमोहन शाळेतील मतदान केंद्रात येऊन Raj Thackeray यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे.
sanata news च्या video बातम्या पहाण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रात 29 तारखेला शेवटच्या टप्प्यातील मतदान होत असून सकाळपासून मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असून मतदानाचा अधिकार बजावत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील दादर मधिल बालमोहन विद्यामंदिर शाळेत आपल्या कुटुंबीयांसहित मतदान केलं.
Video पहाण्यासाठी खाली क्लिक करा.अथवा या लिंकवर क्लिक करा.
पण यावेळी मतदान केंद्रावर असणारी गर्दी आणि इतर गोष्टींमुळे राज ठाकरेंना जवळपास दोन तास रांगेत उभं राहावं लागलं.
सनाटा के हिंदी समाचार पढने के लिए क्लिक करे।
Raj Thackeray सकाळी ११ वाजता मतदान करण्यासाठी केंद्रावर येणार असल्याने प्रसारमाध्यमांनी गर्दी केली होती.
राज ठाकरे कुटुंबीयांसह ११.३० वाजण्याच्या दरम्यान केद्रावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे व मुलगी उर्वशी ठाकरे उपस्थित होते.
राज ठाकरे येताच प्रसारमाध्यमांनी राज ठाकरेंची छबी टिपण्यासाठी त्यांना गराडा घातला.
पण यामुळे मतदान केंद्रावर जाणारा मार्ग अडल्याने सोबतच वरिष्ठ नागरिकांना धक्का लागत असल्याने राज ठाकरे प्रसारमाध्यमांवर चांगलेच भडकले.
आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेछा देण्यासाठी क्लिक करा
एका कॅमेरामनचा त्यांनी हात धरून बाजूलाही केलं आणि शांत राहा असंही सांगितलं.
मतदान केंद्रावर आधीच रांग लागली होती. राज ठाकरेही कुटुंबासहित रांगेत उभे होते.
ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या आईंना लगेचच मतदानाचा हक्क बजावता आला. मात्र यावेळी जास्त वेळ लागल्याने राज ठाकरे जवळपास दोन तासाहून जास्त वेळ रांगेत उभे राहिले.
मतदान करुन आल्यानंतरही राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसहित प्रसारमाध्यमांना फोटो दिला आणि निघून गेले.
मागील बातमी :Raj Thackeray latest speech Solapur:Bjp च्या जाहिरातीतील Harisal मधील मुलगा मनसे च्या स्टेजवर