ताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील रेशनिंग दुकानदारांकडून शासन परिपत्रकाला केराची टोपली.!

Advertisement

(Ration shopkeepers) ग” परिमंडळ कार्यालयातील दुकानदारांकडून पोर्टब्लेटी नुसार नागरिकांना धान्य देण्यास नकार.

(Ration shopkeepers) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :

पुणे शहरातील अन्न वितरण कार्यालयाच्या अखत्यारित येणारे ग” परिमंडळ विभागातील

स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना शासन परिपत्रकानुसार पोर्टब्लेटीद्वारे धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शासन परिपत्रकानुसार नागरिकांना कोणत्याही रेशनिंग दुकानातून धान्य घेता येते.

परंतु घोरपडे पेठ भागातील दुकानदार हे सरासर नियम धाब्यावर बसवून नागरिकांना या दुकानातून त्या दुकानात पळवत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दर महिन्याला ज्या दुकानातून धान्य देण्यात येत होते त्या दुकानात ७ मे रोजी एक वृद्ध महिला गंज पेठेतील दुकानात गेली असता त्यांना दुकानदाराने लोहियानगर येथील कस्बे दुकानदाराकडे जायला सांगितले,

कस्बे दुकानदाराकडे त्या वृद्ध गेल्या असता त्यांना घोरपडे पेठेतील गॅलक्सी अपार्टमेंट मधील ग/३८ फरीद शेख यांच्या रेशनिंग दुकानात जाण्यासाठी सांगितले गेले.

तर त्या चालत गॅलक्सी अपार्टमेंट मधील शेख यांच्या रेशनिंग दुकानात गेले असताना त्या दुकानदाराने आमच्याकडे नाही तर दुसरीकडे आहे तिथे जाण्यास सांगितले.

तिसऱ्या दुकानदाराकडे जाऊन पाहणी केली असता त्या दुकानातील मुलाने पुन्हा गॅलक्सी अपार्टमेंट मध्येच असून तुम्हाला त्या ठिकाणीच धान्य मिळणार असल्याचे सांगितले.

त्या वेळी संबंधित महिलेने सजग नागरिक टाईम्सच्या प्रतिनिधीला संपर्क साधून सर्व पिळवणूक सांगितली

व ते सांगत असताना त्या वृद्ध महिलेला आश्रु अनावर झाले.

Refusal-to-give-grain-to-citizens-as-per-portability-from-ration-shopkeepers.

सजग प्रतिनिधीने ऑनलाईन पाहणी केली असता गॅलक्सी अपार्टमेंट मधील शेख यांच्या दुकानातच शिधापत्रिकाधारक महिलेचे नाव दिसत होते.

Advertisement

त्यावेळी गॅलक्सी अपार्टमेंट मधील रेशनिंग दुकानात जाऊन फोन लावून देण्यास सांगितले असता त्या गोलगोल फिरविणा-या दुकानदाराने रांगेत थांबण्यास सांगितले होते.

परंतु त्या दुकानदाराने कहरच केला दोन तास त्या वृद्ध महिलेला उन्हात थांबवून नंबर आल्यावर आता वेळ संपली आहे तुम्ही सोमवारी येवून धान्य घेऊन जाण्यास सांगितले.

ह्या दुकानदाराने माणूसकीची हदच पार केली आहे.अश्या दुकानदारांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

हा रेशनिंग दुकानदार दिवसाभरात किती लोकांना उन्हात भटकंती करण्यास लावत असेल ?

आदीच लॉकडाऊनमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे,

अश्यात या दुकानदारांकडून त्रास देणे म्हणजे जखमेवर मिट चोळण्या सारखे झाले आहे.

सदरील दुकानदार नागरिकांना रेशनकार्डवरील धान्य हि कमी देत असल्याचे स्थानिक नागरिक चर्चा करत होते.

अश्या मुजोर दुकानदारावर कारवाई करण्यास ग” परिमंडळ अधिकारी कमी पडत आहे का ?.

नागरिकांना वेळेवर धान्य मिळते किंवा नाही,

मिळत असेल तर किती ? याची अचानक पणे पाहणी करण्याचे काम ग” परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षकाचे आहे.

सदरील अधिकारी कार्यालयात बसून रेशनिंग दुकानदारावर अंध विशवास ठेवून नागरिकांवर अन्याय करण्यास दुकानदाराला मोकळे रान दिले आहे.

अधिका-याच्या या अंध विश्वासामुळे नागरिकाना त्रास भोगावे लागत आहे.

नागरिकांची पिळवणूक करणा-या दुकानदारावर स्थानिक नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे.

कस्बे व शेख यांची दुकाने तपासणी करणार का ? का त्यांना पाठीशी घालणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.

जर यांच्यावर कडक कारवाई केली नाहीतर अधिकारी व दुकानदाराची मिलीभगत समजून,

त्रस्त नागरिक यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले.

वाचा : क्या लाया था,क्या ले जायेगा ?

Share Now